शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा असो वा मुलगी; २१ व्या वर्षीच लागणार हळद, उडणार लग्नाचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलींचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषत: ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशात महिलांसाठी विवाहाचे वय किमान १८ वर्षे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे होते. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांचे लग्नाचे वय १८वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही २१व्या वर्षांनंतरच आता हळद लागणार आहे.  केंद्रीय महिला टास्क फोर्स आणि बालविकास मंत्रालयाच्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याला कायदेशीर मान्यता मिळेल. वयोमर्यादा वाढविल्यानंतर लवकर लग्न करण्यासाठी बळी पडणाऱ्या मुलींना दिलासा मिळेल. 

समानतेच्या मार्गावरील महत्त्वाचे पाऊल

सध्याच्या स्थितीत मुलींनीही उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. मात्र १८वर्षांनंतर मुलींना लग्नासाठी आग्रह धरला जात होता. यात त्यांचे शिक्षण अर्धवट राहत होते. चांगल्या नोकरीसाठी चांगले शिक्षण आवश्यक आहे. निर्णय योग्य आहे. - अनिल काकडे

आजही ग्रामीण भागात मुलींची सर्वाधिक लग्न इयत्ता बारावीनंतर होतात. त्यामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहत होते. पर्यायाने संधी असूनही त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येत नव्हते. या निर्णयामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढेल.- भीमराव भगत

 शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच नाही मोडणार 

लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलींचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषत: ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटणार नाही. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणतातसरकारने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. यामुळे मुली शिकतील, स्वत:च्या पायावर उभ्या राहतील, नापास झाले की लग्न करून टाका असे घडणार नाही. कुपोषित माताही राहणार नाही.- सुनील भेले

लग्नाचे वय वाढविल्याने मुलींना करिअर घडविण्याची संधी मिळेल. शहरी भागात हा निर्णय उत्तमच राहील. मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती करावी लागणार आहे. - पुष्पा फाळके

 

टॅग्स :marriageलग्न