शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जेसीबीने पोखरले जलयुक्त शिवार

By admin | Updated: August 31, 2015 02:14 IST

महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात बोगस जेसीबीने पोखरले असून कोट्यवधीच्या या कामात रोजगार हमी योजनेतील मृत मजुराच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे.

सुरेंद्र राऊत यवतमाळ महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात बोगस जेसीबीने पोखरले असून कोट्यवधीच्या या कामात रोजगार हमी योजनेतील मृत मजुराच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. आरटीओ दप्तरी नोंद नसलेल्या जेसीबी या कामावर राबवून अनेकांनी आपले उखळ पांढरे केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कामांची चौकशी झाल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. पाणलोटच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून त्याला अभियानाचे स्वरूप देण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामांबाबत गंभीर असून त्यांनी नुकताच जिल्ह्यातील जलयुक्त कामांचाच आढावा घेतला. या अभियानातील कामांमध्ये अपहार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणेकडून कामांचे मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र निर्ढावलेले अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने पद्धतशीरपणे धूळ फेक केली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून २८ कोटींची कामे मंजूर झाली होती. ही कामे मिळविण्यासाठी अनेकांनी खटाटोप केला. अस्तित्वात नसलेल्या जेसीबीच्या खोट्या आरसी बुक तयार करून कृषी विभागाला सादर केल्या. कृषी विभागाने कोणतीही शहनिशा न करता या कंत्राटदारांना काम अग्रक्रमाने दिले. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता कामे देण्यात आली. त्यामुळेच बोगस जेसीबी मशीन जिल्ह्यात कागदोपत्री अस्तित्वात आल्यात. गतवर्षी रोहयोच्या कामावर मृत मजूर राबल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मृतांच्या नावांवर मस्टर भरून अधिकारी व कंत्राटदारांनी लूट केली होती. झरी तालुक्यात कोट्यवधींचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले होते. अशीच पुनरावृत्ती आता जलयुक्त शिवारच्या कामात होत असल्याचे पुढे येत आहे. पाणलोटच्या खोदकामाचे दर कृषी विभागाने वाढविण्याची मागणी जेसीबी मालक संघटनेने केली होती. प्रति लिटर २० रुपये दरात काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर शासनाने खोदकामाचे दर २९ रुपये ५० पैसे प्रति मीटर इतके केले होते. मात्र काम वाटप करताना मूळ जेसीबी मालकांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले. ज्यांनी अर्थपूर्ण संबंध निर्माण केले. त्यांनाच ही कामे मिळाली आहे. नि:क्षप चौकशी झाल्यास बडे मासे गळाला लागतील.