शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: May 14, 2014 02:02 IST

तालुक्यातील जवळपास प्रत्येक खेड्यामध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मोठय़ा प्रमाणात सुळसुळाट झाला आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील जवळपास प्रत्येक खेड्यामध्ये अवैध व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरांचा मोठय़ा प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने आदिवासी आणि गरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. काही बोगस डॉक्टर तर आपली बॅग घेऊन खेडोपाडी फिरुन आदिवासी गरीब रुग्णांवर चुकीचे औषधोपचार करीत आहेत. या डॉक्टरांजवळ महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलचे कोणतेही प्रमाणपत्र नाही. परंतु आपण असाध्य रोगही दुरुस्त करीत असल्याचा खोटा प्रचार ही बोगस डॉक्टर मंडळी करीत आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कोणतेही प्रमाणपत्र नसलेल्या या तथाकथित डॉक्टरांकडून अल्प किंमतीत औषधोपचार मिळत असल्यामुळे परिसरातील भोळी-भाबडी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहे. या डॉक्टरांचे एजंटही परिसरात सक्रिय असून ते असाध्य रोग दुरुस्त होत असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या खोट्या प्रचाराला अनेक आदिवासी रुग्ण बळी पडत आहे.

तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास २0 ते २५ बोगस डॉक्टर सक्रिय आहेत. सदर डॉक्टर रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधी, गोळया, इंजेक्शन जवळचे देतात. यातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तालुक्यात सर्वत्र संचार असलेल्या या बोगस डॉक्टरांनी रुग्णांच्या जिवीताशी खेळ सुरु केला आहे.

वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसली, तरी मोठय़ा आत्मविश्‍वासाने हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना दिसून येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने या डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो. मध्यंतरी या बोगस डॉक्टर मंडळीविरुध्द काही जागरुक नागरिकांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हाही नोंदविला होता. परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)