दारव्हा येथे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:46 IST2021-08-24T04:46:09+5:302021-08-24T04:46:09+5:30

रक्तदान शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक सय्यद करीम, अशोकराव ...

Blood donation camp by Congress at Darwha | दारव्हा येथे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

दारव्हा येथे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक सय्यद करीम, अशोकराव चिरडे, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे, दिलीप चौधरी, सलीम सोलंकी, विजय पाचकोर, रामधन जाधव, कैलास साबळे, अमोल बोबडे, गणेशराव म्हातारमारे, हाजी मोबीन खान, उत्तमराव गोमासे, गजानन बिबेकर, मतीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाला माणिकराव ठाकरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. गुड्डू वझरकर, प्रशांत गिरी यांनी सहकाऱ्यांसह काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कार्यक्रमाला काँग्रेस, युवक, महिला काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, अरूण नांदेकर, विजय गोकुळे, अतुल राऊत, लाला पांडे, अनिल लोथे, जमन काझी, अब्दुल जावेद, प्रमोद लोंढे, सतीश बागल आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp by Congress at Darwha