शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिवरी येथे अंध तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: May 16, 2016 02:37 IST

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका अंध तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

परिस्थितीपुढे हतबल : पोलिसांची दिरंगाईहिवरी : परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका अंध तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. सदर इसम अविवाहित असून तो आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता. अशोक बापुराव राऊत (४०) रा. हिवरी असे मृताचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने अशोक गावातील चक्कीवर पीठ मागून चरितार्थ चालवित होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या आईला जबरदस्तीने मनदेव येथील एका लग्न सोहळ्यात पाठविले. इकडे त्याने घराला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. दुपारी माहिती दिल्यानंतरही रात्री ७.३० वाजेपर्यंत यवतमाळ ग्रामीण पोलीस पोहोचले नव्हते. अशोकचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत होता. त्याच्या घरापुढे गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांप्रती गावकरी रोष व्यक्त करीत होते. अंध अशोकच्या मृत्यूनंतरही पोलीस वेळेवर पोहोचले नाही. (वार्ताहर)लोहारा येथे आत्महत्यायवतमाळ : शहरातील लोहारा येथील रेमण्ड कॉलनी परिसराच्या मागे एका इसमाचे गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. किसन पुनाजी थोंबे (५५) रा. साईनगर असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री त्याने पळसाच्या झाडा दोन बांधून आत्महत्या केली असवी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.