शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामी शेतकऱ्यांंना बाजार समितीकडून ब्लँकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने लांबलेला सोयाबीनचा हंगाम संपताच शेतमाल विक्रीकरिता बाजारात आला आहे. सर्वच शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली आहे. दर दिवसाला क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीन बाजारात येत आहे. यामुळे सोयाबीन विक्रीकरिता आणणाºया शेतकºयांना मुक्काम करावा लागत आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त हमाल बोलावले : आता सुटीच्या दिवशीही शेतमालाचा लिलाव, शेतमालावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत दरदिवशी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. काटा होण्यासाठी दोन-दोन दिवस शेतकºयांना मुक्कामी रहावे लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच बाजार समिती व्यवस्थापनाने मुक्कामी शेतकऱ्यांसाठी ब्लँकेटची व्यवस्था केली आहे. शिवाय सोयाबीनचे मोजमाप लवकर करता यावे याकरिता अतिरिक्त हमालही बोलाविण्यात आले आहे. सुटीच्या दिवशीही लिलाव केला जात आहे.परतीच्या पावसाने लांबलेला सोयाबीनचा हंगाम संपताच शेतमाल विक्रीकरिता बाजारात आला आहे. सर्वच शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली आहे. दर दिवसाला क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीन बाजारात येत आहे. यामुळे सोयाबीन विक्रीकरिता आणणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे.हा गुंता सोडविण्यासाठी बाजार समितीने ठोस पावले उचलली आहे. सोयाबीनची आवक नियंत्रित करण्यासाठी लागणारे अतिरिक्त हमाल आणण्यात आले आहे. यामुळे शेतमालाचा काटा करताना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय सुटीच्या दिवशीही आलेल्या सोयाबीनचा हर्रास करण्यात आला.लिलाव प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून रोटेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. ओटा पध्दतीचा अवलंब केला जात आहे. यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.शेतमालावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराप्रत्येक ओट्यावरील सोयाबीन सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या सीसीटीव्हीला संचालकांच्या अ‍ॅपसोबत जोडण्यात आले आहे. यामुळे कुठे गोंधळ उडाल्यास तत्काळ माहिती होणार आहे. कुठल्या सूचना द्यायच्या राहिल्यास त्यावरून तत्काळ देता येणार आहे.जेवणासाठीही अतिरिक्त पाससध्या निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी जैन ट्रेडिंग कंपनीने शेतकऱ्यांना थंडीपासून सुरक्षा देण्यासाठी ब्लँकेट पुरविले आहे. तर भोजनाची व्यवस्था अपुरी पडू नये आणि माफक दरात भोजन मिळावे म्हणून अतिरिक्त पास गर्दीत वितरित करण्यात आल्या आहे. एकूणच कामकाजामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड