शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्या रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर सर्रास होत आहे.

ठळक मुद्देदाम दुप्पट : रुग्णाच्या नावाने औषध येत असल्याचा परिणाम

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वहन क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर होत आहे. त्यामुळे त्याला प्रचंड मागणी आहे. याचाच फायदा घेऊन यवतमाळात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्या रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा वापर सर्रास होत आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यानंतर त्यावर तातडीचा उपचार म्हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन वापरले जाते.कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अचानक रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. उत्पादन मर्यादित असल्याने त्याची टंचाई जाणवत आहे. हे इंजेक्शन कोरोना रुग्णालय चालविणाºया डॉक्टर, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण यांनाच मिळते. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.कोविड रुग्णांची सर्वत्रच लूटकोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीसोबतच आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कोरोनाचा धाक दाखवून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिंदे प्लॉटमधील खासगी कोविड रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका चालक चक्क दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. नागपूरला उपचारासाठी जायचे असल्यास रुग्णवाहिकेचे भाडे उपचार खर्चाइतकेच आकारले जाते. कोरोना रुग्णांच्या अगतिकतेचा व्यापार केला जात आहे.रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्याचा पुरवठा ठोक विक्रेत्यांकडूनच व्हायला हवा. शिवाय खासगी कोविड हॉस्पिटलच्या परिसरातील रिटेलरला विक्रीची परवानगी द्यावी. तरच रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार थांबणे शक्य आहे.- पंकज नानवाणी, अध्यक्ष केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळ.कोरोना पॉझिटिव्ह अहवाल व डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. तशा सूचना शासन स्तरावरूनच आल्या आहेत. सध्या उत्पादन मर्यादित आहेत. गोव्यात नवीन युनिट सुरू झाल्यानंतर उपलब्धता वाढेल.- संजय राठोडऔषध निरीक्षक, यवतमाळ .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या