भाजपची सत्ता, तरीही कामांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:21+5:30

नगरपरिषदेची घडी मागील पाच वर्षापासून विस्कटलेली आहे. पालिकेतील अर्थकारणात सर्वात महत्वाचा घटक येथील घनकचरा कंत्राट आहेत. यातूनच मोठी उलाढाल होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील अर्थकारण याच कंत्राटाभोवती फिरत आहे. अप्रत्यक्षरीत्या यात अनेकांचे हितसंबध अडकलेले आहेत. त्यात बाजार वसुली, घनकचरा गोळा करणे, रस्ते सफाई यासह इतरही कंत्राटाचा समावेश आहे.

BJP's power, still workload | भाजपची सत्ता, तरीही कामांचा बोजवारा

भाजपची सत्ता, तरीही कामांचा बोजवारा

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद, भाजप नगरसेवकांची आज चिंतन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेत भाजपचे बहुमत व सत्ता असूनही येथील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कोणावर कोणाचे नियंत्रण नाही. विषय समिती सभापती रबर स्टॅम्प बनले असून प्रशासन जुमानत नसल्याच्या सूर आहे. यातच शहरातील घनकचऱ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने भाजप गटनेत्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. पक्ष कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता ही बैठक होत आहे.
नगरपरिषदेची घडी मागील पाच वर्षापासून विस्कटलेली आहे. पालिकेतील अर्थकारणात सर्वात महत्वाचा घटक येथील घनकचरा कंत्राट आहेत. यातूनच मोठी उलाढाल होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील अर्थकारण याच कंत्राटाभोवती फिरत आहे. अप्रत्यक्षरीत्या यात अनेकांचे हितसंबध अडकलेले आहेत. त्यात बाजार वसुली, घनकचरा गोळा करणे, रस्ते सफाई यासह इतरही कंत्राटाचा समावेश आहे. हितसंबंधांमुळे प्रशासनावर कोणाचीच पकड नाही. याचा परिणाम शहरातील स्वच्छतेवर होत आहे. हितसंबंध दुखावले गेल्यानंतर कंत्राटदाराची बिले अडविली जातात. याचा थेट परिणाम शहर स्वच्छतेवर होतो. आता कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने प्रत्येक नागरिक साठलेल्या घनकचऱ्याबाबत तक्रार करत आहे. या तक्रारींना सामान्य नगरसेवकांनाच तोंड द्यावे लागते. अनेक जण स्वत:च्या खिशातून जनतेची सेवा करण्याइतके सक्षम नाहीत किंवा त्यांना तसे मार्ग अजूनही सापडले नाहीत. अशा नगरसेवकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
रविवारच्या बैठकीत विविध मुद्दांवर चर्चा केली जाणार आहे. नगरसेवकांना वॉर्डात काम करताना येणाºया अडचणी मांडणे, पक्षाची अधिकृत भूमिका घेऊन पालिकेत काम करणे यावर चर्चा होणार आहे.

सर्वसाधारण सभेची सदस्यांना प्रतीक्षाच
कोरोना विषाणू संसर्गामुळे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली नाही. पुढे ही सभा केव्हा घेतली जाईल, याबाबत शाश्वती नाही. अशा स्थितीत नगरसेवकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी व त्यावर चर्चा करण्याकरिता भाजप गटनेते विजय खडसे यांनी रविवारची बैठक आयोजित केली.

Web Title: BJP's power, still workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.