शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे अहीर यांची हॅट्ट्रिक

By admin | Updated: May 17, 2014 00:32 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विजयाची हॅट्ट्रिक करीत

वणी : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विजयाची हॅट्ट्रिक करीत विद्यमान पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी दारून पराभव केला. अंतर्गत गटबाजीची काँग्रेसला बसलेली ही चपराक पुढील राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंंत ती सातत्याने कायम राहिली. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५२ हजार ६१५ होती. यापैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेत व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तिक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे.

येथील उद्योग भवनात मतमोजणी केली जाणार असल्याने आज सकाळी ७.३0 वाजपासून नागरिकांची बसस्थानक व उद्योगभवन परिसरात गर्दी होऊ लागली. मात्र सकाळी ८.३0 वाजेपर्यंंत जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी मतमोजणीला सुरुवातही केलेली नव्हती. त्यामुळे उत्सुक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.

वणी, आर्णीमध्ये आघाडी

महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी-पांढरकवडा विधानसभा मतदार संघातही निर्णायक आघाडी घेतली. वणी विधानसभा मतदार संघात ९२ हजार १0८ तर संजय देवतळे यांना ३८ हजार २६0 मते प्राप्त झाली. त्याप्रमाणे आर्णी विधानसभा मतदार संघात तब्बल एक लाख १0 हजार ७४५ तर देवतळे यांना ५0 हजार ९३१ मते मिळाली. वणी विधानसभा मतदार संघातून अहीर यांनी काँग्रेसचे उमेदवार यांच्यावर तब्बल ५३ हजार ८४८ हजार मतांची आघाडी घेतली. त्याचप्रमाणे आर्णी विधानसभा मतदार संघातून तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी प्राप्त केली. त्यामुळे अहीर यांना विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी प्राप्त झाली. सन २00९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदार संघातून अहीर यांना केवळ एक हजारांच्यावर मतांची आघाडी होती. तर वणी विधानसभा मतदार संघातून त्यावेळी काँग्रेसचे नरेश पुगलिया यांना एक हजार मतांच्या जवळपास आघाडी होती. यावेळी मात्र मोदी लाटेमुळे अहीर यांना या दोनही मतदार संघातून तब्बल ५0 हजारांच्या वर आघाडी घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)