शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशालिटी हाॅस्पिटलमधील कोट्यवधींची यंत्र धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

या रुग्णालयासाठी राज्य शासनाने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहे. मात्र, यापैकी केवळ दोन नर्सेस, एक डॉक्टर व तीन लिपिक इतकेच मनुष्यबळ मिळाले आहे. यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू होणे शक्य नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम केले. त्याचे हस्तांतरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झालेले नाही. त्यामुळे पुढची सर्व प्रक्रिया रखडली आहे. 

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दुर्धर आजारांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक उपचार सुविधा असणारे सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल मंजूर झाले. यावर १५५ कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली. अत्याधुनिक यंत्र खरेदी झाली आहे. यापैकी २७७ यंत्र रुग्णालयात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून ही यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. वापराविनाच ही यंत्र निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना काळात सुपर स्पेशालिटीची इमारत कोविड वार्ड म्हणून वापरात होती. आता कोरोना रुग्ण नसल्याने ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. या सुसज्ज इमारतीचा रुग्णालय म्हणून वापर कधी होईल याची प्रतीक्षा आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजाराचे निदान होण्यासाठी अत्याधुनिक अशा महागड्या मशिनरी खरेदी केल्या आहेत. यामध्ये सीटी स्कॅन, संगणकीकृत रेडियालॉजी युनिट, स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारे डिजिटल मेमोग्राफी सिस्टीम, हृदयरोगाचे निदान करणारे फोर-डी कलर ड्राॅपलर इको कार्डिओग्राफी यंत्र, पोर्टबल इको कार्डिओग्राफी, मेंदूवर शस्त्रक्रियेसाठी लागणारे न्युरोसर्जिकल ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, मल्टिपॅरामीटर मॉनिटर १६, फायबर ऑप्टिक ब्रोन्कोस्कोप, ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन विथ मॉनिटर यासह अनेक महत्त्वाची यंत्र आली आहे. ती ठेवण्यासाठी रुग्णालय परिसरात जागा नाही. बेवारस अवस्थेत कोट्यवधीची यंत्रे पडून आहेत. ती सुरू होतील की नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. या रुग्णालयासाठी राज्य शासनाने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहे. मात्र, यापैकी केवळ दोन नर्सेस, एक डॉक्टर व तीन लिपिक इतकेच मनुष्यबळ मिळाले आहे. यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू होणे शक्य नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम केले. त्याचे हस्तांतरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झालेले नाही. त्यामुळे पुढची सर्व प्रक्रिया रखडली आहे. 

रुग्णांची उपचारासाठी परवड- अतिविशेष उपचार रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रिया, कॅन्सरसारख्या आजाराचे निदान व उपचार, स्पाईनवरील शस्त्रक्रिया, लहान मुलांवरील दुर्धर शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी लागणारी ही सर्व यंत्रसामग्री आहे. आज ही उपचार प्रणाली उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना महानगरांकडे धाव घ्यावी लागत आहे. अनेकांची आर्थिक स्थिती नसल्याने गरीब रुग्ण उपचार घेऊ शकत नाही. आजार अंगावर काढतच मृत्यूला कवटाळतात. असे असले तरी सुसज्ज झालेली सुपर स्पेशालिटी इमारत व यंत्र सामग्री वापरात येत नाही. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे हस्तांतरण झालेले नाही. या रुग्णालयासाठी यंत्रसामग्री पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ही यंत्रे अधिकृतरीत्या स्वीकारलेली नाही. त्या कंपन्या स्वत:च्या जबाबदारीवरच विविध यंत्र आणून ठेवत आहे. सध्या ती रुग्णालय प्रशासनाने ताब्यात घेतली नाही. घेताना ती सुरू अवस्थेतच आहे की नाही याची खात्री केली जाईल. तूर्त पदभरती व इमारत हस्तांतरणासाठी पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. मिलिंद फुलपाटील अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल