शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बसपाच्या नेतृत्वात धडकला मोर्चा

By admin | Updated: September 30, 2016 02:49 IST

बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात गुरूवारी समता मैदानातून

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ‍ॅट्रोसिटी, मुस्लीम आरक्षणाची मागणी, हजारोंची उपस्थिती यवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात गुरूवारी समता मैदानातून निघालेल्या मोर्चातील निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांनी यतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. हा मोर्चा कुणाहीविरूद्ध नसून आपल्या न्याय मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी असल्याचे शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन देताना स्पष्ट केले. २६ जानेवारी २०१५ च्या सुधारित अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि मुस्लीम समाजाला आरक्षणासह इतर पाच प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रथम मोर्चेकरी समता मैदानात गोळा झाले. यावेळी मैदानात सर्वत्र निळे आणि पिवळे झेंडे डौलाने फडकत होते. अनेक मोर्चेकऱ्यांच्या हाती झेंडे होते. मोर्चेकऱ्यांना पंडित दिघाडे, गीत घोष, ताराचंद पवार, डॉ. निरंजन मसराम, अनिल दसमोगरे, मनीषा तिराणकर आदींनी संबोधित केले. यावेळी प्रफुल शंभरकर, प्रवीण ्नखानझोडे, बाळकृष्ण गेडाम, प्रफुल गेडाम आदी उपस्थित होते. नंतर दुपारी २ वाजता बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. (शहर प्रतिनिधी)