शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

बँक ग्राहकाचे पावणे तीन लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

होम लोन खात्याचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने विशालशी दीर्घ चर्चा करत त्याला ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीने विशालकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला.

ठळक मुद्दे‘अ‍ॅप डाऊनलोड’चा फटका। ‘कस्टमर केअर’कडे चौकशी करणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गृहकर्जाचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकाने कस्टमर केअरला कॉल केला. या कॉलवरून त्या ग्राहकाला संबंधित व्यक्तीने पावणे तीन लाखांचा गंडा घातला. कस्टमर केअरच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून गंडविले.विशाल धनराज गावंडे (३८) रा.चिंतामणीनगर, वैभवनगरजवळ वाघापूर असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. विशालने होम लोन घेतले होते. होम लोन खात्याचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने विशालशी दीर्घ चर्चा करत त्याला ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीने विशालकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने एफडीची रक्कम कस्टमर आयडीचा वापर करीत चालू खात्यात वळती केली. त्यानंतर चालू बँक खात्यातून परस्पर दोन लाख ७१ हजारांची रक्कम काढून घेतली. हा प्रकार २६ मे ते २८ मे दरम्यान घडला. बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर विशालने लोहारा पोलीस ठाणे गाठले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्याने पोलिसांकडे ही माहिती दिली. लोहारा ठाण्यात गुन्हा नोंदविला.बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नफिक्स डिपॉझिटची रक्कम ही ठराविक काळासाठी सुरक्षित असते. त्या रकमेचा चालू बँक खात्याशी थेट संबंध येत नाही, असे असतानाही परस्पर ऑनलाईन पद्धतीने एफडीतील रक्कम बँक खात्यात वळती झालीच कशी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बँकेच्या एफडी सुरक्षा प्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.पोलीस निरीक्षक करणार तपासलोहारा येथे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लुले ठाणेदार आहे. ऑनलाईन फसवणूक व आयटी अ‍ॅक्टच्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जातो. त्यामुळे हा गुन्हासुद्धा वर्ग केला जाणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी