पीओपींच्या गणेशमूर्ती स्थापनेवर बंदी घाला

By Admin | Updated: August 24, 2014 00:15 IST2014-08-24T00:15:58+5:302014-08-24T00:15:58+5:30

महामानवांच्या जीवनचरित्रातून समाजाला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. महापरुष हे समाज व राष्ट्रासाठी आदर्श असतात. परंतु अलिकडच्या काळात महामानवांच्या विटंबनांचे प्रकार वाढले

Ban on the establishment of POP's Ganesh idol | पीओपींच्या गणेशमूर्ती स्थापनेवर बंदी घाला

पीओपींच्या गणेशमूर्ती स्थापनेवर बंदी घाला

पुसद : महामानवांच्या जीवनचरित्रातून समाजाला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. महापरुष हे समाज व राष्ट्रासाठी आदर्श असतात. परंतु अलिकडच्या काळात महामानवांच्या विटंबनांचे प्रकार वाढले ते थांबविण्याचा एक प्रकार म्हणून महामानवांच्या प्रतिमांचा कोठेही वापर होऊ नये तसेच पर्यावरणाचा धोका म्हणून पीओपीच्या गणेशमूर्तीसुद्धा बसविण्यात येवू नये, अशी मागणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पुसदचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू व शहरचे ठाणेदार रमेश सोनुने यांना संघटनांकडून निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, येत्या २९ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून यामध्ये महापुरुषांच्या रूपातील विडंबनात्मक सजावट करण्यात येवू नये. कारण गणेशमूर्तीचे दहा दिवसानंतर पाण्यात विसर्जन करण्यात येते. मात्र महामानवांचे पाण्यात विसर्जन करीत नसतात. तसेच पीओपीपासून तयार केलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळत नाहीत, असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.
तर सदर मूर्ती पाण्यात वाहत जावून मूर्तीची विटंबना होवून भावना दुखावल्या जावू शकतात. या संदर्भात शहरातील मूर्तीकारांना व गणेश मंडळांना सूचना देण्यात याव्या व सूचना देवूनही तसा प्रयत्न झाल्यास मूर्तीकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
विशेष म्हणजे पीओपीच्या मूर्ती बसविण्यावर महाराष्ट्र शासनाकडून यापूर्वीच बंदी आणण्यात आली आहे. सदर बाबीची योग्यवेळी खबरदारी घ्यावी व महापुरुषांची विटबंना थांबवावी, अशी मागणीही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिग्रेड, पुसदच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पिंटू पाटील, उपाध्यक्ष अनिल कदम, कार्याध्यक्ष जीवा जाधव, सचिव अमोल साखरे, संभाजी ब्रिगेडचे रज्य उपाध्यक्ष सुधीर देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पानपट्टे, जिल्हा सचिव प्रा.प्रकाश लामणे, तालुकाध्यक्ष नितीन पवार, शेखर नादरे, राजू पाटील, गणेश पावडे, विक्रांत भाकरे, सुरज ठाकरे, संदीप सरकटे, किरण पाटील, वसंता राठोड, मंगेश करण, संदीप चौधरी, परीक्षित टनमने आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ban on the establishment of POP's Ganesh idol