शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव कोरोना नियंत्रण समितीने लाॅकडाऊनचा विषय लोकांवर सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी यावेळी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : कोरोनाचा वाढता आलेख आणि तहसीलदारांच्या अहवालावर लॉकडाऊनचा निर्णय या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी कोरोना नियंत्रण समितीची तालुकास्तरीय सभा घेण्यात आली. यावेळी मंचावर नायब तहसीलदार वाय. ए. निवल, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महेश जामनोर, पंचायत समिती सभापती रोशनी ताडाम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, उपसभापती सीमा दामोधर, माजी सभापती गौतम लांडगे, माजी उपसभापती हेमंत ठाकरे, नीलेश दंदे आदी उपस्थित होते. नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी यावेळी मांडले.सध्या सुरू असलेली व्यवहाराची वेळ ९ ते ५ हीच कायम ठेवावी, असे मत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाशचंद छाजेड यांनी व्यक्त केले. कोपरा (बारड) येथील ३० वर्षीय मुलाचा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याचे सुरू असलेले औषध थांबविले होते. याविषयी माजी सभापती गौतम लांडगे यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल होतात. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, असे सभापती राेशनी ताडाम यांनी सांगितले. आठवडी बाजार बंद करावा, असे यावेळी ठरले. सभेला प्रकाशचंद छाजेड, अनिकेत पोहेकर, शहजाद शेख, राजू नवाडे, धीरज रूमाले, ओमप्रकाश गुप्ता, शेख रफिक,        शोयब घाची, आनंद घटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या