जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

By Admin | Updated: September 21, 2014 23:58 IST2014-09-21T23:58:43+5:302014-09-21T23:58:43+5:30

माना समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

Avoiding getting caste certificates | जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

मारेगाव : माना समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़
तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी हे ‘माना’ या जातीचे आहेत़ यापूर्वीच माना जातीला घटनेच्या अनुसूचित जाती, जमाती सुधारणा अधिनियम कायदा १९७६ नुसार अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त झाला आहे़ त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०११ पर्यंत माना जमातीचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे़ तक्रारकर्त्यांच्या मुलानेही जात प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांकडे प्रकरण सादर केले. मात्र दीड वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही़ त्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याचे भविष्य धुळीस मिळाले आहे़
स्रेहल नन्नावरे व शीतल नन्नावरे यांच्या नावांचे केंद्रीय प्रपत्रामध्ये जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल झाले आहे. या चारही प्रकरणातील जातीचे प्रमाणपत्रे मागील तीन ते पाच महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहे़ त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसून कोणताही निर्णय देण्यात आला नाही़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे व त्वरित जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Avoiding getting caste certificates