शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: May 28, 2015 02:01 IST

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय रद्द करावा, डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, ...

वणी : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय रद्द करावा, डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ व जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला. या निर्णयाचा मराठा सेवा संघाने निषेध नोंदविला. पुरंदरे यांनी आपल्या लेखणातून सातत्याने धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बाबी जाणीवपूर्वक मांडल्या, असा त्यांचा आरोप आहे. शहाजी महाराज, जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीत विकृत लेखन करून त्यांचा पुरंदरे यांनी अपमान केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणातून महिलांबाबत अत्यंत हिणकस व असभ्य भाषा वापरल्याचा आरोपही मराठा सेवा संघाने केला. त्यामुळे त्यांना घोषित केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा, तसेच शिवचरित्रात विकृती घुसडणाऱ्या त्यांच्या सर्व साहित्याची समीक्षा करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. महाराष्ट्राचे खरे भूषण ठरलेले आणि जनसामान्यांना आपल्या विचारातून आणि साहित्यातून सत्य सांगणारे पुरोगामी चळवळीतील दिवंगत गोविंद पानसरे व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहे. सरकारसाठी ही अत्यंत अत्यंत अपमानास्पद बाब असून शासनाच्या कारभारावर शंका निर्माण करणारी आहे. या बाबी ध्यानात घेता पोलीस यंत्रणेने या दोन्ही हत्येमागील मारेकऱ्यांना आणि सुत्रधारांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही मराठा सेवा संघ व जगतगुरू तुकोबारा साहित्य परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली. (प्रतिनिधी)