शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीसाठी अन्नत्याग सत्याग्रह

By admin | Updated: October 3, 2015 02:23 IST

पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे ...

पुसद विकास मंच : सत्याग्रह मंडपाला अनेकांची भेट पुसद : पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे यासाठी पुसद विकास मंचने विडा उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू करण्यात आले आहे. या सत्याग्रह मंडपाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.येथील टिळकस्मारक मंदिराच्या प्रांगणात अन्नत्याग आंदोलन शुक्रवार २ आॅक्टोबरपासून सुरू झाले आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. गत दोन दशकांपासून पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडला आहे. पुसद विकास मंचच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान, ठिय्या आंदोलन, संघर्ष रॅली आदी काढण्यात आली. हे आंदोलन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. सचिन नाईक, अभय गडम, साकीब शाह, अभिलेश खैरमोडे हे गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहे. पुसद परिसराच्या विकासासाठी पुसद जिल्हा होण्याशिवाय कोणताही उपाय नाही. त्यामुळे सर्व घटकांच्या दृष्टीने जिल्हा होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.सत्याग्रह मंडपाला माजी कुलगुरू डॉ.शेषराव सूर्यवंशी, डॉ. वजाहत मिर्झा, महेश खडसे, डॉ. ओमप्रकाश काकण, वसंतराव पाटील कान्हेकर, नायब तहसीलदार धबाले, नारायण पवार, उमाकांत चक्करवार, शिवाजी देशमुख, मनोहर बनसकर, प्रा. संध्या कदम, प्रा. महेंद्र पखाले, प्रा. सुधीर गोटे, वामनराव देशमुख, भारत वानखडे, नारायणराव क्षीरसागर, एजाज खान, स्वप्नील ढगे, अतुल नागरे, पंडित मानतुटे, सुधाकर चापके, नथ्थूराम राठोड आदींनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी निशांत बयास, धनंजय सोनी, नारायण पुलाते, पंकज पारधे, कैलास जगताप, मनोहर बनसकर, राहुल कांबळे, रवी ग्यानचंदाणी, किरण देशमुख, देवेंद्र खडसे, अ‍ॅड. चंद्रशेखर शिंदे, अ‍ॅड. कैलास राठोड, बाळासाहेब बरडे, श्रीकांत सरनाईक, अ‍ॅड. प्रशांत कागदेलवार, नाना बेले, संजय बजाज, अ‍ॅड. उमेश रेवणवार, डॉ. संजय भांगडे, संजय भंडारी यांच्यासह पुसद येथील अनेक नागरिक सहकार्य करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)आंदोलनाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा पुसद जिल्हा निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पुसद येथील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पुसदकर जनतेनेही या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पुसद जिल्हा निर्मिती हा आता अस्मितेचा प्रश्न झाला असून पुसद जिल्हा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.