शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती ४६ टक्के तर नागपूर विभागात ३७.५९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 11:25 IST

Yawatmal News गुरुवारी सकाळपर्यंत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पात ४६.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता.

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सध्या यवतमाळसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असला तरी पाणीसाठ्याच्या दृष्टीने विदर्भाला आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी सकाळपर्यंत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पात ४६.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मागील वर्षी याच तारखेपर्यंत तो ४५.३४ टक्के होता. तर नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये ३७.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ५०.१४ टक्के पाणी उपलब्ध झाले होते. राज्यातील पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता त्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागात आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने सर्वदूर हजेरी लावली. राज्यात सर्व प्रकारचे मिळून एकूण तीन हजार २६७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात गुरुवारी सकाळपर्यंत ५०.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो साधारण १० टक्क्याने अधिक असला तरी राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागातील पाणीसाठा अद्यापही कमी असल्याचे दिसते.

अमरावती विभागात दहा मोठे प्रकल्प आहेत. यात ५९.७७ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. तर नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात ४५.०१ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांची आकडेवारी पाहिली असता एकूण १४१ प्रकल्पात ६०.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. काहीशी अशी स्थिती मध्यम प्रकल्पांच्या बाबतीत आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पात ४४.६९ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. मागील वर्षी ते ४४.६७ टक्के इतके होते. नागपूर विभागातील ४२ मध्यम प्रकल्पात १७.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो साधारण निम्मा आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ३४.१६ टक्के पाणी उपलब्ध होते. या विभागातील लघु प्रकल्पांची स्थिती पाहिली असता अमरावतीअंतर्गतच्या ४११ प्रकल्पात १६.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर नागपूर विभागातील ३२६ लघु प्रकल्पात ११.३४ टक्के पाणीसाठ्याची उपलब्धता आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात दुप्पटीहून म्हणजे ३१.७६ टक्के पाणी उपलब्ध होते.

 

टॅग्स :Waterपाणी