लोकहित महाविद्यालयात आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:06+5:302021-04-16T04:42:06+5:30

पुसद : स्थानिक मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचालित लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ...

Ambedkar Jayanti at Lokhit College | लोकहित महाविद्यालयात आंबेडकर जयंती

लोकहित महाविद्यालयात आंबेडकर जयंती

पुसद : स्थानिक मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचालित लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महेश खडसे होते. प्राचार्य संजीवकुमार वाघमारे, पी.एस. जाधव, रुपेश आसेगावकर, नितीन धनरे आदी उपस्थित होते. महेश खडसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. संचालन अनंत माळकर यांनी केले. यावेळी प्रा. प्रकाश लामणे, नितीन लोळगे, समीर शेख, पांडुरंग बुरकुले, राजाराम तिवारी, दत्ता शिंदे, विशाल इंगोले, विनोद शिंदे, सी.एम. वाघ, गिरीश केशववार, राहुल जयस्वाल, अभिमन्यू शिंदे, व्ही.एन. ठोंबरे, प्रवीण पाईकराव, संदीप राठोड, प्रदीप रंगारी, नफिस पठाण, रामदास घाटे आदी उपस्थित होते.

Web Title: Ambedkar Jayanti at Lokhit College