योगशिक्षक महासंघातर्फे आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:09+5:302021-04-16T04:42:09+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे जिल्हा प्रभारी शरद बजाज होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रभारी डॉ. मनोज ...

Ambedkar Jayanti on behalf of Yoga Teachers Federation | योगशिक्षक महासंघातर्फे आंबेडकर जयंती

योगशिक्षक महासंघातर्फे आंबेडकर जयंती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे जिल्हा प्रभारी शरद बजाज होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रभारी डॉ. मनोज निलपवार, केंद्रीय सचिव मनोज नाईक, मनकर्णिका नाईक, जिल्हा महिला प्रभारी माया काळेकर, लता देशमुख उपस्थित होत्या. यावेळी वंदना, त्रिशरण व पंचशीलचे पठण करण्यात आले.

याप्रसंगी योग शिक्षिका सुलोचना वानखडे यांनी योगातील वायसीबी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आणि श्रेया जगदीश नाईक यांनी बीएएमएस पदवी उच्च गुणांनी उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शैलजा मडके, वसंत काळेकर, प्रवीण मस्के, संतोष वानखडे, चक्रधर नरवाडे, अनिल पडघने, भगवान पाईकराव, रामजी जंगले, अविनाश महाजन, वैष्णव महाजन, प्रशांत अर्धापूरकर, अमित अर्धापूरकर, संतोष वंजारे, गोपाल सातळे, ऋतुजा हेडे, मनोरमा मनवर, कल्पना सोनोने, पुष्पा नाईक, वर्षा इंगोले, संगीता नरवाडे, किरण नाईक, कल्पना मस्के, अर्चना पडघने, निर्मला सातपुते आदींची उपस्थिती होती. संचालन मनोज नाईक, आभार डॉ. अमोल खांदवे यांनी मानले.

Web Title: Ambedkar Jayanti on behalf of Yoga Teachers Federation