शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व ठाणे होणार आॅनलाईन पालकमंत्री : लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

By admin | Updated: October 4, 2015 00:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा ...

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा लागू करून ४६ सेवा आॅनलाईन केल्या आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे टप्प्या-टप्प्याने आॅनलाईन करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला एमआयडीसी परिसरात लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, लोहाराचे सरपंच बबलू देशमुख, वाघापूरचे सरपंच विक्की राऊत, नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सुमित बाजोरिया, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष सुराणा, माजी अपर पोलीस अधीक्षक सोने, एमआयडीसीचे सह-कार्यकारी अधिकारी रावते आदी उपस्थित होते.पालकमंत्री राठोड म्हणाले की, आजही महाराष्ट्र पोलीसांची गणना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांसोबत होते. मात्र अपुरे मनुष्यबळ, सततच्या ड्यूटी, वसाहतीचा प्रश्न यामुळे पोलीस बांधव तणावात राहतात. शासनाने पोलिसांवरील तणाव कमी करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन कामाच्या पद्धतीत बरेच बदल केले आहे. पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आग्रही असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार भावना गवळी यांनी पोलिसांकडून कधी प्रेमाने तर कधी पोलिसी खाक्याने कामाची अपेक्षा असल्याचे सांगितले. कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नेहमीच तत्पर असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी गुन्हेगारांवर नेहमी जरब निर्माण करावी. सामान्य जनतेसाठी मात्र त्यांनी आईच्या भूमिकेत असले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. आभार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मानले. तर सूत्रसंचालन अजित डेहणकर यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजकांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)