शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीला मोकळे रान

By admin | Updated: November 30, 2015 02:15 IST

तालुक्याच्या सीमेला लागूनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट यांना सुगीचे दिवस आले आहे.

पोलीस चौक्या हटल्या : वणी, पांढरकवडाकडून चंद्रपूरकडे वाहतेय दारूची गंगावणी : तालुक्याच्या सीमेला लागूनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट यांना सुगीचे दिवस आले आहे. वणीकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पोलीस चौक्या हटल्याने आता दारू तस्करील रान मोकळे झाले आहे. दररोज दारू नेणारे एखादे तरी वाहन पोलिसांच्या हाती लागत आहे. पोलिसांचा डोळा चुकवून जाणारी अनेक वाहने दारूच्या साठ्यासह चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा सततचा रेटा व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्धाराने चंद्रपूर जिल्हा नुकताच दारूबंदीच्या यादीत आला. त्यामुळे जिल्ह्यातील शौकिनांना आता आपले कसे, असे वाटू लागले होते. दारूबंदी होताच पोलीस प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर पाटाळा, घुग्गुस व बोरी येथे पोलीस चौक्या बसविलेल्या होत्या. वणीकडून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात होता. दुचाकीसह महामंडळाच्या बसमधील प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी केली जात होती. त्यामुळे दारू तस्करीला चांगलाच लगाम लागला होता.दारूबंदी झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील व्यसनाधीन व शौकिनांना चिंता भेडसावू लागली होती. मात्र त्यांची ही चिंता फार काळ टिकली नाही. लवकरच दारू तस्करांनी पोलीस विभागाशी संधान साधून आपली कामगिरी फत्ते करून घेतली. सीमेवरील पोलीस चौक्या प्रशासनाने हटविल्या. आता सर्वत्र पोलीस व दारू तस्करांचे ‘सेटींग‘ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पांढरकवडा, मारेगाव, झरी, वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने जात आहे. आता केवळ पैसेच अधिक मोजावे लागतात. दारूबंदी नसताना जेवढी दारू मिळत होती, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात दारू आता चंद्रपूर जिल्ह्यात मिळत असल्याचे चंद्रपूरवासीयच सांगत आहे.पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील दारू दुकानदार व बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये आता ग्राहक करण्यापेक्षा दारू तस्करी करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या ग्राहकांपेक्षा तस्करीकडे त्यांचे अधिक लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यापासून पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील देशी-विदेशी दारू दुकानांचा तसेच वाईन व बिअर बारचा खप लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात वणीत येत असल्याने वणीतील दारू दुकानांचा खपही वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र या खपापेक्षाही तस्करीमुळे दारूची गंगा चंद्रपूर जिल्ह्यात वाहत असल्याने विक्रीचा उच्चांक निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)