शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: February 25, 2015 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात.

फुलसावंगी : शेतकऱ्यांच्या समस्यांचा आधारवड समजले जाणारे तालुका कृषी कार्यालय सध्या वाऱ्यावरच दिसत आहे. तालुक्यातून शेकडो शेतकरी कामाच्या निमित्ताने येतात. मात्र कार्यालयातील टेबल-खुर्च्या रिकाम्याच दिसतात. तासन्तास प्रतीक्षा करूनही अधिकारी-कर्मचारी येत नाही. शनिवारी शेकडो शेतकरी या कार्यालयात आले होते. मात्र कृषी कार्यालयात स्मशान शांतता दिसत होती.महागाव कृषी कार्यालयात प्रस्तूत प्रतिनिधीने शनिवारी फेरफटका मारला. त्यावेळी कार्यालय सताड उघडे आणि टेबल -खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. यावेळी तालुक्यातून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी वऱ्हांड्यात अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. या शेतकऱ्यांना बोलते केले असता त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींचे मोबाईल स्वीच आॅफ आढळून आले. छाया प्रकाश खाडे ही शेतकरी महिला शनिवारी या कार्यालयात आली होती. त्यांनी दीड वर्षापूर्वी शासनाच्या ५० टक्के अनुदानातून शेतातील सिंचनासाठी स्प्रिंकलर खरेदी केला. परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. दीड वर्षांपासून त्या कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. कृषी सहायकाला विचारणा केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे छाया खाडे यांनी सांगितले. गावात कृषी सहायकाचे दर्शन होत नसल्याचे इजनी येथील अनिल वानखडे, कौडगावचे अनिल भोने, दशरथ जाधव, फुलसावंगीचे रामदास घोडे, विष्णू कळंबकर, चिल्ली येथील प्रेमसिंग राठोड, मुरलीधर पांडे, दगडथर येथील संजय मुडे यांनी सांगितले. कृषी सहायक गावात येत नसल्याने आम्हाला आर्थिक झळ सोसून तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तेथेही कुणी भेटत नाही. तक्रार करावी तर वरिष्ठही जागेवर नसतात, असे सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यासह कृषी अधिकारी, कृषी सहायक, कनिष्ठ लिपिका, वरिष्ठ लिपिक असे नऊ कर्मचारी येथे कार्यरत आहे. त्यापैकी केवळ लिपिक ए.जी. उप्पोड आणि कृषी सहायक ए.डी. दानबाजे उपस्थित होते. तर महागाव, काळी या दोन मंडळात चार पर्यवेक्षक, २४ कृषी सहायकांपैकी १७ ते १८ कृषी सहायक कार्यरत आहे. तालुका कृषी विभागाचा फौजफाटा मोठा असला तरी शेतकऱ्यांंना मात्र त्यांचा शोेध घ्यावा लागतो. यावेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही जण प्रशिक्षणाला तर काही जण दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)