शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची आता आपत्ती निवारणासाठी तयारी

By admin | Updated: May 30, 2016 00:06 IST

प्रशासन एकीकडे दुष्काळाशी लढण्याचा सामना करीत आहे. पाणीटंचाई, जलशिवार, जलसंधारणाची कामे, रोजगार आदींमध्ये ...

राळेगाव व कळंब तालुका : समन्वयाच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाराळेगाव : प्रशासन एकीकडे दुष्काळाशी लढण्याचा सामना करीत आहे. पाणीटंचाई, जलशिवार, जलसंधारणाची कामे, रोजगार आदींमध्ये शक्ती लावत असतानाच दुसरीकडे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाळ्यात संभावित नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासही तयारी करीत आहे. नैसर्गिक आपत्ती दरम्यान जीवित हानी आणि वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना, आपत्ती काळात मदत घेण्यासाठी संबंधितांची अद्यावत यादी, संपर्क क्रमांकाची पडताळणी, पूरग्रस्त गावांची यादी तयार करून पोलीस ठाणे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना पुरविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी राळेगाव व कळंब तहसीलदारांना दिले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना समन्वयाच्यादृष्टीने यासंदर्भात सूचना आणि दक्षतेचे निर्देश दिले आहेत. दोन्ही ठिकाणचे गटविकास अधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनाही पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित होऊन गावात रोगराई पसरणार नाही याची खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची सभा घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याबाबतची माहिती घेऊन पूर्व तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे रुग्णालयात अँटीव्हेनम लस उपलब्ध असल्याबाबतची खात्री करून घेण्याबाबतचे सूचित केले आहे. संबंधित महत्त्वपूर्ण अधिकारी, अधिनस्त कर्मचारी या काळात सर्व दिवस हजर राहतील, त्यांचे मोबाईल सुरू राहतील याबाबतची खात्री करून घ्यावी, आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. पाणीटंचाईचा आढावा घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे. जलयुक्त शिवारची कामे गुणवत्ता राखून जलदगतीने पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कळंब आणि राळेगाव या दोनही तालुक्यात आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आवश्यक त्या सूचना सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनाही करण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)