शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रशासनाची दवंडी

By admin | Updated: January 17, 2015 00:18 IST

कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

यवतमाळ : कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावागावात जाऊन दवंडी पिटावी असे स्वतंत्र आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. मार्च आणि जूनमध्ये याचा टप्पा येतो. यापूर्वी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्र स्वतंत्र जनजागृती मोहीम हाती घेणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक आरक्षीत संवर्गातील जागेसाठी उमेदवारच मिळाले नाहीत. ही अडचण लक्षात घेता शक्य होईल त्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्राच्याबाबतीत जागृती करावी यासाठी गावातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी पथनाट्य अथवा दवंडीच्या माध्यमातून याची माहिती द्यावी, ग्रामसभांमध्ये शिबिर घेण्यात यावे असे निर्देश आयोगाने दिले.महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांमधील निवडणुकीच्या आधी प्रभाग रचना आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच ज्या ठिकाणी आरक्षीत जागा आहेत अशा ठिकाणी व्यापक प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उमेदवारांमध्ये जागृती करावी. जेणेकरून उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ती जागा रिक्त राहू नये, अशी तसदी जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी व्यापक मोहीम कशी राबवावी याच्या टिप्स राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र काढून घ्यावे, त्यासाठीची प्रक्रिया काय याबाबत दवंडी दिली जाणार आहे. इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. एकंदर हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेतील मोठी उणीव दूर करण्यासाठी उपयोगी ठरणारा आहे. यापूर्वी आरक्षीत जागेसाठी केवळ जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने उमेदवारच मिळत नव्हते. त्यामुळे ६१ टक्के आरक्षीत जागेपैकी ४१ टक्के पदे रिक्त रहात होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगानेच स्वतंत्र कार्यक्रम आखून दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)