शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव गुजरीमध्ये स्मशानभूमी अभावी उभ्या पिकात करावे लागताहेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गाव तेथे स्मशानभूमी असा शासनाचा उपक्रम असताना राळेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम गुजरी  येथे ग्रामस्थांना उभ्या पिकात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.  स्वातंत्र्यानंतरही येथे स्मशानभूमीची व्यवस्था होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे. गुजरी येेेेथे १४ ऑगस्ट रोजी गावातील शेवंताबाई बापूराव वाघाडे (६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना चार मुले असून तीन एकर शेत त्यांना सिलिंगचे मिळाले आहे. त्यातील दोन एकर शेत त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने केले, उर्वरित एक एकर शेत स्वतःच्या नावावर ठेवले हाेते. गावात स्मशानभूमी नसल्याने  शेतातील कपाशीचे उभे पीक कापून  म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या समस्येबाबत ग्रामसेवक व सरपंचांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. गट क्रमांक २९१ मधील झीरो ४० आर क्षेत्र स्मशानभूमीकरिता राखीव आहे. परंतु स्थानिक राजकारण व काही लोकांचा विरोध असल्यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून स्मशानभूमी उभारता आली नाही. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला ही जागा हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर १३ ऑगस्टला स्मशानभूमीची राखीव जागा म्हणून फलक लावल्याचे ग्रामपंचायत  सदस्य अखिल धांडे यांनी सांगितले. स्मशानभूमीकरिता गावात राखीव जागा आहे. दोन वेळा निधी आला, परंतु जागा उपलब्ध न झाल्याने व गावातील राजकारणाने निधी परत गेल्याचे ग्रामसचिव विजया पाटील यांनी सांगितले. 

प्रशासनाचा कानाडोळा, राजकारण्यांचे दुर्लक्ष- आदर्श ग्राम गुजरी येथे गीताचार्य तुकाराम दादा यांनी भेट दिली आहे. या गावाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेेत. त्यानंतरही येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघाली नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना राजकारण्यांचे. त्यामुळेच ग्रामस्थांतून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत