शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेतृत्वावर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: July 18, 2014 00:19 IST

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे लागेल. कधी काळी राज्याला तब्बल १३ वर्ष नेतृत्व देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आज काँग्रेसची वाताहत झाली आहे. म्हणायला काँग्रेसचे पाच आमदार दिसत असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काय केले, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद यवतमाळ जिल्ह्याकडे आहे. परंतु जिल्ह्याला त्याचा काही एक फायदा झाला नाही. पाच आमदार, त्यातील दोघांकडे लालदिवा, स्वत: प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे असूनही काँग्रेसच्या पदरी काहीच पडू शकलेले नाही. जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा बँक, सहकारातील संस्था यातील काहीच काँग्रेसच्या हाती नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पाच आमदार असून पक्षाला उपयोग काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. विद्यमान मंत्री-आमदार व प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकाळात यवतमाळ जिल्ह्याची काँग्रेस प्रचंड माघारली. होत्याचे नव्हते झाले. नवे काही तर मिळाले नाहीच, उलट जवळ असलेलेही अन्य पक्षांनी हिसकावून नेले. कार्यकर्त्यांना मंडळ, महामंडळ, समित्याही देता आलेल्या नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या या नेतृत्वाविरोधात कार्यकर्त्यांनी उघड बंड पुकारले आहे. गेल्या महिन्यात १६ पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. तर दोन दिवसांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसची झालेली दुरवस्था पाहून माजी नगराध्यक्षांनी नेत्यांवर तोंडसुख घेतले. या स्वार्थी नेत्यांचा ‘मी आणि माझा मुलगा’ हा डाव आता कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनीसुद्धा ओळखला आहे. त्यामुळेच या नेत्यांचा आगामी विधानसभेतील प्रवास चांगलाच खडतर बनणार आहे. पाच वर्षात काय केले, हे मतदारांपुढे दाखविण्यासाठी या नेत्यांकडे काहीच नाही. यावेळी मतदारच नव्हे तर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या नेत्यांना गावागावात जाब विचारण्यासाठी सज्ज आहेत. लोकसभेत पानीपत झाले असतानाही काँग्रेसचे नेते अद्याप हारतुऱ्यातून बाहेर निघायला तयार नाहीत. राज्यभरातील पक्षाच्या नवनियुक्त विधान परिषद सदस्य आणि शेजारच्या खासदाराचा सत्कार शुक्रवारी येथे आयोजित आहे. वास्तविक या लोकप्रतिनिधींचा आपल्या जिल्ह्यात काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार झाला आहे. त्यामुळे पुन्हा हे आयोजन कशासाठी असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहे. काही दिवसांपूर्वीच्या बंडानंतर यानिमित्ताने एकजूट दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)