शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बसपाच्या तीन नगरसेवकांवर कारवाई

By admin | Updated: November 22, 2014 01:58 IST

विधानसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या तीन नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई करत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या तीन नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई करत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते. याची बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी दखल घेतली असून, या तीनही नगरसेवकांना पक्षातून सहा वर्षासाठी निष्कासित करण्यात आले आहे. यवतमाळ विधानसभेत बसपाने आपला अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला होता. त्यानंतरही बसपाच्या नगरसेकांनी विरोधी भुमिका घेऊन ऐन वेळेवर काँग्रेस उमेदवारासोबत हातमिळवणी केली. शहरात बसपाचे एकुण चार नगरसेवक असून, निवडणूक काळात केवळ ज्योती खोब्रागडे यांनी पक्षाचे काम केले. इतर नगरसेवक वेळेवरच विरोधी गटात जाऊन बसले. या त्यांच्या कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. हरीष पिल्लारे, पंकज मेश्राम, ज्योती आडे या तिघांनाही पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे बहुजन समाज पार्टीतून सहा वर्षासाठी निष्कासित करीत असल्याचा आदेश प्रदेश उपाध्यांनी दिला आहे. शिवाय या तिन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असा प्रस्तावही पक्षाकडून लवकरच दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे नगरपरिषद वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. नगरपरिषदेत सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकुण पालिकेत सदस्यत्व मिळविलेल्या अनेक नगरसेवकांनी सोयीनुसार भुमिका बदलली आहे. नगरपालिकेतील राजकारणात पक्षांना कुठलेचे स्थान नाही. हे अनेकवेळा झालेल्या घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. केवळ गटातटाशी जुळवून घेत नगरसेवकांची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. कुणीही काही नगरसेवकांबाबत ते नेमके कोणत्या पक्षाचे आहे हे सांगूच शकत नाही. यामध्ये सत्ताधारी, विरोधक आणि नव्यानेच पालिकेत आलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. ज्येष्ठ सदस्यही सातत्याने येथे भुमिका बदलविताना दिसतात. त्यामगे कोणता आधार आहे, याचे उत्तर मात्र अजूनही कुणालाच मिळालेले नाही. अशाच स्थितीत पक्षाकडून नगरसेवकांकडून कारवाई करणे ही बाब नवीन राहिलेली नाही. सर्वातप्रथम काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर निष्कासनाची कारवाई केली. त्यानंतर येथील शहर विकास आघाडीने व्हीप झुगारला म्हणून माजी नगराध्यक्षासह सात नगरसेवकांवर अपात्रतेचा खटला दाखल केला. आता बसपाकडून तोच कित्ता गिरविण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)