शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला

यवतमाळ : राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला असून दहा दिवसांनी त्यांची फौजदारी संपुष्टात येणार आहे. कर्मचाऱ्याचे फौजदार झालेल्या ४० जणांना पुन्हा आपल्या पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागणार असल्याने त्यांना चुटपूट लागली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून गृह विभागाने एका आदेशान्वये सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आटोपताच आपल्याला पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागेल, असेही आदेशात नमूद होते. पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच अनेकांची फौजदार होण्याची सुप्त इच्छा असते. मात्र पदोन्नतीने थेट फौजदारकी मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. गृह विभागाने काढलेल्या या आदेशाने औटघटकेचे का होई ना आपल्याला फौजदार होता येईल, या अपेक्षेने जिल्हा पोलीस दलातील अनेकांनी फौजदारीसाठी अर्ज केले होते. त्यातील निवडक ४० जणांना सेवाज्येष्ठतेनुसार निवडणुकीपूर्वी फौजदारी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या वेतनावरच संबंधित कर्मचाऱ्यांना ही फौजदारी देण्यात आली. आता निवडणूक आटोपून फौजदारीचा कालावधीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपत आहे. १० दिवसांनी फौजदारकी जाणार या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. गृह विभागाने एखादा नवा पर्याय शोधून सेवाज्येष्ठांना फौजदारपदी कायम करावे, अशी अपेक्षा त्यांना असली तरी ते काही शक्य नाही. त्यामुळे अनेकांना चुटपूट लागली आहे. अनेकांनी तर फौजदाराच्या वर्दीतील फोटो आठवण म्हणून काढून ठेवले आहे. त्यांचा आता पुरता हिरमोड होणार असल्याचेही सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)