शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या ९७ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे.

ठळक मुद्देबोगस सोयाबीन बियाण्यांचा हजारो शेतकऱ्यांना फटका, दुबार पेरणीसाठी उधारीवर आणले बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस सोयाबीन बियाण्यांच्या सावटात जिल्ह्यातील खरिपाच्या ९७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. बियाणे बोगस निघाल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे खरेदी करावे लागले.जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या सहा हजारांवर तक्रारी आहेत. त्यापैकी केवळ एक हजार शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलवून दिले आहे. मात्र पाच हजार शेतकरी पंचनामे होऊनही अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कंपन्यांकडून तत्काळ बियाणे बदलवून देण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे पाहून अखेर काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले तर काहींना नाईलाजाने कृषी केंद्रांमधून उधारीवर बियाणे दुबार पेरणीसाठी घ्यावे लागले. कृषी केंद्रांनीही मग आपल्याकडून पडून असलेल्या बियाण्यांच्या बॅग उधारीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या. आता हे बियाणेसुद्धा उगवते की नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. आतापर्यंत ९७ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. आणखी तीन टक्के पेरण्या बाकीच आहेत. कदाचित बियाणे कंपन्यांकडून सोयाबीनचे बियाणे बदलवून मिळेल या प्रतीक्षेत हे तीन टक्के शेतकरी थांबले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यांचा चांगलाच फटका बसला. जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यवतमाळातील ठोक बियाणे विक्रेत्यांनी सुरुवातीला कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने सोयाबीन बियाणे विकले तर येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे दुसऱ्या जिल्ह्यात परस्परच विकले गेले. ठोक विक्रेत्यांनी निर्माण केलेल्या कृत्रिम टंचाईपासूनच जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला जणू ग्रहण लागले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीसाठी बियाणे कंपन्यांसोबतच यवतमाळातील ठोक विक्रेते आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी दोषी मानत आहे.यवतमाळच्या हक्काचा १५०० मेट्रिक टन युरिया पुन्हा पळविलायवतमाळ जिल्ह्याच्या हक्काचा १४०० मेट्रिक टन युरिया नांदेड व धामणगावच्या रॅक पॉईंटवरून पळविल्याचे उदाहरण ताजे असताना शुक्रवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. धामणगावच्या रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्यासाठी २४०० मेट्रिक टन युरिया आला होता. परंतु त्यातील एक हजार मेट्रिक टन अमरावतीने तर ५०० मेट्रिक टन युरिया वर्धेने रॅक पॉईंटवरूनच पळविला. यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला अवघा ९०० मेट्रिक टन युरिया आला. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा युरियासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती