शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयान

By admin | Updated: September 13, 2014 00:37 IST

सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी सुरू आहे.

यवतमाळ : सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी सुरू आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाणार असून त्यासाठी तत्कालीन ८८ पोलीस अधिकारी-कर्मचारी व संबंधितांना नोटीस जारी करण्यात आली आहे. सन २००३ मध्ये धामणगाव रोडवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असताना त्या युवकांना विष प्राशन केलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांपासून हे प्रकरण विविध न्यायालयांमध्ये गाजते आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्ष जुन्या या प्रकरणाची दखल घेत औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. ११ सप्टेंबरपासून या चौकशीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र अचानक महासंचालकांनी बैठक बोलविल्याने आयुक्त राजेंद्रसिंह मुंबईला निघून गेले. त्यामुळे हा कार्यक्रम बारगळला. आता या चौकशीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दरम्यान या चौकशीच्या अनुषंगाने प्रकरणाशी संबंधित तत्कालीन सुमारे ८८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटीस जारी करून बयानासाठी हजर राहण्याचे सूचित करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांचे बयान औरंगाबादला नोंदविणार की यवतमाळात हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ते सध्या औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर आणि मृताच्या नातेवाईकाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला. (प्रतिनिधी)