शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी ६५ टक्के मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:32 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यात गुरूवारी उत्साहात मतदान पार पडले.

सर्वत्र शांततेत : पुसद, महागाव, दिग्रस आणि उमरखेड येथे प्रचंड उत्साहपुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यात गुरूवारी उत्साहात मतदान पार पडले. सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिग्रस तालुक्यातील कळसा येथील अपवाद वगळत सर्वत मतदान शांततेत पार पडले. महागाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणासाठी शुक्रवारी अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील ९४ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून, आता सर्वांना २३ फेब्रुवारीची प्रतीक्षा लागली आहे. कोणदरी येथे मतदान केंद्रावर किरकोळ वाद झाल्याने आठ जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३३.७७ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजता वसंतनगर लेवा येथील एक मतदान यंत्र बंद पडले त्यामुळे तासभर मतदान खोळंबले होते. निवडणूक निर्णय अधिकारी विजय भाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन सुरू केले. बहुतांश उमेदवार आपापल्या मतदारसंघात मतदान केंद्रांना भेटी देत असल्याचे दिसत होते. कोणदरी येथे मतदानावरून दोन गटात हाणामारी झाली. एकमेकांच्याविरुद्ध तक्रारीवरून आठ जणांविरुद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. शेषराव दीपला राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी लहू जयसिंग राठोड, पिंटू जयसिंग राठोड, संतोष मधुकर राठोड, मधुकर रूपसिंग राठोड तर लहु राठोड यांच्या तक्रारीवरून संदीप चंद्रभान राठोड, शेषराव दीपला राठोड, उत्तम बाला राठोड, भिकम बाला राठोड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार करीम बेग मिर्झा यांनी तालुक्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. उमरखेड तालुक्यातील पाच गट आणि दहा गणांसाठी गुरूवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्हा परिषदेचे २८ आणि पंचायत समितीच्या ४९ अशा ७७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. तालुक्यातील मुरली, ढाणकी, सोनदाभी, बिटरगाव, निंगणूर, जवराळा याठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागून होत्या. त्यामुळे येथे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. या निवडणुकीने ग्रामीण भागात प्रचंड उत्साह दिसून आला. दिग्रस तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरूवारी मतदान झाले. ८८ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. तालुक्यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. (लोकमत चमू)