शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोघेंच्या आर्णी विधानसभेत भाजपाला ६० हजारांची आघाडी

By admin | Updated: May 17, 2014 23:52 IST

आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगणार्‍या शिवाजीराव मोघे यांच्या परंपरागत मतदारसंघातच भाजपाने आघाडी घेतली

यवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगणार्‍या शिवाजीराव मोघे यांच्या परंपरागत मतदारसंघातच भाजपाने आघाडी घेतली. थोडीथोडकी नव्हेतर भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा तब्बल ५९ हजार ८१४ मते अधिक मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोघेंना धोक्याची घंटा ठरू शकते. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे तब्बल ९३ हजार ८१६ मतांनी पराभूत झाले. पराभवानंतर आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर आपल्याला मिळालेल्या मतांच्या आकड्यात निश्चितच वाढ झाली असती, असे मत शिवाजीराव मोघे यांनी मांडले होते. मात्र आर्णी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडीच काय जबर फटका बसल्याचे दिसून येते. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना एक लाख १० हजार ७४५ तर काँग्रेसचे संजय देवतळे यांना ५० हजार ९३१ मते मिळाली. ५९ हजार ८१४ मताधिक्याने अहीर विजयी झाले. त्यामुळे मोघे यांचा हा दावा सपसेल फेल ठरला, असेच म्हणावे लागेल. आर्णी हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. शिवाजीराव मोघे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहे. मात्र त्यांचा आपल्या मतदारसंघावर किती प्रभाव आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. विशेष म्हणजे आदिवासीबहुल आर्णी मतदारसंघात भाजपाला मिळालेली प्रचंड आघाडी राजकीय विश्लेषकांनाही विचार करायला लावणारी आहे. मोदींची लाट होती, असे सांगत आपल्या पराभवावर पांघरुण घालण्याचा आता प्रयत्न केला जात आहे. मात्र मतदारांनी काँग्रेसला आर्णी विधानसभा क्षेत्रातही का नाकारले, याची कारणमिमांसा कुणीही करताना दिसत नाही. देशात लाट होती. विदर्भात एकही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळविता आलेली नाही. याच समर्थनावर आपल्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाजीराव मोघे यांनी प्रचारासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना आर्णी-केळापूरमधून बोलावले होते. त्यामुळे ही मंडळी यवतमाळात तळ ठोकून होती. परिणामी काँग्रेसला आर्णीमध्ये सक्षम कार्यकर्तेच मिळाले नाही आणि भाजपाने या संधीचे सोने केले. (नगर प्रतिनिधी)