शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपरिषदांमधील ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द

By admin | Updated: November 4, 2016 02:03 IST

आठ नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन छानणी प्रक्रियेत ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द झाले.

नगराध्यक्षपदाचे २८ अर्ज बाद : ११ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार विड्रॉलयवतमाळ : आठ नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन छानणी प्रक्रियेत ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या २८ उमेदवारांनाही याचा जबर फटका बसला आहे. यामुळे २१६ जागांसाठी १२४७ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये १०५ वॉर्डातील २१६ जागेसाठी १२४७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६८ नामांकन यवतमाळ नगरपरिषदेच्या क्षेत्रात आहे. यवतमाळात छानणी दरम्यान ९० नामांकन रद्द झाले. यवतमाळात २८ वॉर्डात ५६ जागांसाठी ३६८ उमेदवार रिंंगणात आहेत. वणी नगरपरिषदेमध्ये १३ वॉर्डातील २६ जागांसाठी १९२ उमेदवार रिंंगणात आहेत. छानणीदरम्यान ४३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदाचे सात नामांकन रद्द झाले आहे. या ठिकाणी १७ उमेदवार रिंगणात आहेत.पुसद नगरपरिषदेमध्ये १४ वॉर्डात २९ उमेदवार रिंंगणात आहेत. १६१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. छानणीत ३८ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार रिंंगणात आहेत. ३ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले आहे.दिग्रस नगरपरिषदेमध्ये ११ वॉर्डातील २४ जागांसाठी १२९ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ३३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी १६ पैकी १३ उमेदवार रिंंगणात आहेत. ३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहेत. उमरखेड नगरपरिषदेमध्ये १२ वॉर्डातील २५ जागांसाठी ११५ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ५८ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारांपैकी १० उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. तर ४ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले आहेत. दारव्हा नगरपरिषदेमध्ये १० वॉर्डामधील २० जागांसाठी ९१ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ४८ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवार रिंंगणात होते. ९ उमेदवारांचे अर्ज कायम आहे. पाच उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेमध्ये ९ वॉर्डातील १९ जागांसाठी ९८ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी २९ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. आर्णी नगरपरिषदेमध्ये ६ नगराध्यक्षपदाचे उमेदवार कायम आहेत. या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा एकही उमेदवारी अर्ज रद्द झाला नाही.घाटंजी नगरपरिषदेमध्ये ८ वॉर्डातील १७ जागांसाठी ९३ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ४२ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार रिंंगणात होते. या ठिकाणी ९ उमेदवार कायम आहे. ३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहे. (शहर वार्ताहर)