शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

353 जणांनी नोकरी टिकविली; 90 टक्के बसेस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे.  परिवहन महामंडळाच्या ९० टक्के बसेस आगारातच आहे. केवळ २२ बसेसवर वाहतूक सुरू आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले त्यामध्ये कार्यालयीन कामकाज करणारेच कर्मचारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत दीड महिन्यापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. हा संप अजूनही मिटण्याचे नाव घेत नाही. एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३५३ कर्मचारी नोकरीवर हजर झाले आहे. या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे. परिवहन महामंडळाच्या ९० टक्के बसेस आगारातच आहे. केवळ २२ बसेसवर वाहतूक सुरू आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले त्यामध्ये कार्यालयीन कामकाज करणारेच कर्मचारी आहे. चालक, वाहक यांची संख्या बोटावर मोजण्यासारखी आहे. उत्पन्नाचा स्त्रोत असलेले चालक, वाहक हे कर्मचारी कामावर यावे, अशी अपेक्षा आहे.

अखेरच्या दिवशी सात जण हजर- परिवहन महामंडळाने सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास निलंबन मागे घेण्यात येईल, असा शब्द दिला. यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सात कर्मचारीच अखेरच्या दिवशी आले.

कर्मचाऱ्यांना अल्टीमेटमवर अल्टीमेटम

- परिवहन महामंडळाचा संप सुटता सुटेना असा झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत परत येण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता. - केवळ सात कर्मचारी सोमवारी परतले. अजूनही फार मोठी संख्या आंदोलनात सहभागी आहे. आता महामंडळाने आणखी तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला. 

बसेस धावू लागल्या रस्त्यावर

- आतापर्यंत यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि राळेगाव या तालुक्यातील २२ एसटी बसेस सुरू झाल्या आहे. ४२९ बसेसपैकी केवळ २२ एसटी बसेस सुरू करण्यात परिवहन महामंडळाला यश प्राप्त झाले.

कार्यालयीन कर्मचारी वाढलेएसटीला उत्पादन मिळवून देणारे चालक, वाहक यांची उपस्थिती नगन्य आहे. केवळ कार्यालयीन कर्मचारीच वाढले आहे. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक 

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप