शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार

By admin | Updated: May 22, 2014 01:29 IST

यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वणी : यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खते, बियाणे, तसेच विविध कृषी साहित्य खरेदीवर ही रक्कम खर्ची पडणार आहे.

वणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खत आणि बियाण्यांची विक्री होते. हा तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात उच्च दर्जाचा कापूस निर्माण होतो. सोबतच मोठय़ा प्रमाणात कीटकनाशक आणि रसायनिक खतांची शेतकरी खरेदी करतात. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३0 कोटी रुपयांची उलाढाल होते. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही रक्कम खर्ची पडते. खरीपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव हा ३0 कोटींचा खर्च करतात. पावसाचे संकेत प्रप्त झाल्याने शेतकरी बांधव आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्यात व्यस्त झाले आहे.

आता तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी आत्ताच बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकार्‍यांनी गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. याशिवाय शेतकरी आता सोयाबिनकडेही वळले आहे. सोबतच खरीपात तूर, ज्वारी आदी पिकेही घेतली जातात. तथापि कापूस हेच अद्याप नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तरीही आता सोयाबिनकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सोयाबिनलाही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जात अहे. खरीपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बियाणे बोगस, हे ओळखे कठीण असते. त्यासाठीच कृषी विभागाने गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे.

बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभगाला दिल्या आहेत. त्यानुसार येथील तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वात नुकतेच हे पथक गठित करण्यात आले. त्यात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांसह काहींचा समावेश आहे. हे पथक बोगस कृषी साहित्याचा शोध घेणार आहे.

शेतकर्‍यांकडून तक्रार प्राप्त होताच हे पथक संबंधित वाणांची चौकशी करणार आहेत. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)