शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी मार्गावर २६ झाडे उन्मळली

By admin | Updated: March 12, 2015 02:15 IST

प्रचंड वादळाने यवतमाळ-आर्णी मार्गावरील जवळा ते तरोडा दरम्यान २६ झाडे उन्मळून पडली असून लोणबेहळ सर्कलला गारपिटीचा तडाखा बसला.

आर्णी : प्रचंड वादळाने यवतमाळ-आर्णी मार्गावरील जवळा ते तरोडा दरम्यान २६ झाडे उन्मळून पडली असून लोणबेहळ सर्कलला गारपिटीचा तडाखा बसला. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यात प्रचंड वादळाने गारपीट झाली. सायंकाळी मेघगर्जनेसह प्रचंड वादळाला प्रारंभ झाला. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की, नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील २६ मोठ्ठाली झाडे उन्मळून पडली. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. वीज पुरवठाही खंडित झाला आहे. अर्धातास चाललेल्या या वादळाने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर तालुक्यातील लोणबेहळ परिसरात राणीधानोरा, कवठा बाजार, अंजनखेड, शेंदूरसुनी, अंबोडा, साकूर या गावांना गारांचा तडाखा बसला. साधारणत: १५ ते २० मिनिट लिंबाच्या आकाराच्या गारा कोसळल्या. सायंकाळच्या वेळी झालेल्या या तांडवाने नेमके किती नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही. मात्र अनेक ठिकाणी वृक्ष वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळाचा तडाखा गहू, हरभरा, आंबा या पिकांना बसला आहे. अनेक घरांवरील टीनपत्रेही उडाल्याची माहिती आहे. दरम्यान आर्णी मार्गावर तुटलेली झाडे बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले. मात्र वृत्तलिहेस्तोवर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. निसर्गाच्या या प्रकोपाने शेतकरी पुरता हादरला असून रबी हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)