शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडगाव परिसर, तायडेनगरातील तीन महिला, तीन पुरुष असे सहा जण तर पाच जण कन्यका सोसायटी परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देघोषणा मात्र दहाचीच : सर्वाधिक १४ यवतमाळात, नेर ७, पुसद २, वणी १

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. मात्र प्रशासनाने सायंकाळपर्यंत त्यापैकी दहाच रुग्णांचा आकडा जाहीर केला. इतर रुग्ण घोषित करण्याची प्रतीक्षा आहे.बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडगाव परिसर, तायडेनगरातील तीन महिला, तीन पुरुष असे सहा जण तर पाच जण कन्यका सोसायटी परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या दहा रुग्णांमध्ये यवतमाळातील सहा तर नेरमधील चार रुग्णांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. जिल्ह््यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. सध्या अ‍ॅक्टीव्ह बाधित रुग्णांचा आकडा १०२ असून आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या ३७१ एवढी झाली आहे.आजपासून मार्केट सायंकाळी ७ पर्यंतजिल्ह्यात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढला आहे. सध्या बाजारपेठ सकाळी ९ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ ला बंद केली जाते. परंतु गुरुवार ९ जुलैपासून बाजार बंद होण्याची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. सकाळी ९ ला सुरु होणारी बाजारपेठ सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. आठवड्यातील सर्व सातही दिवस ही नवी वेळ कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.१३ जणांनी केली कोरोनावर मातकोरोनाची लागण झालेल्या १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या या १३ जणांना बुधवारी सुटी दिली गेली. आतापर्यंत २७० रुग्ण बरे झाले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या