जिल्ह्यात २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:16+5:30

बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडगाव परिसर, तायडेनगरातील तीन महिला, तीन पुरुष असे सहा जण तर पाच जण कन्यका सोसायटी परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.

25 new corona positive in the district | जिल्ह्यात २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देघोषणा मात्र दहाचीच : सर्वाधिक १४ यवतमाळात, नेर ७, पुसद २, वणी १

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. मात्र प्रशासनाने सायंकाळपर्यंत त्यापैकी दहाच रुग्णांचा आकडा जाहीर केला. इतर रुग्ण घोषित करण्याची प्रतीक्षा आहे.
बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडगाव परिसर, तायडेनगरातील तीन महिला, तीन पुरुष असे सहा जण तर पाच जण कन्यका सोसायटी परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या दहा रुग्णांमध्ये यवतमाळातील सहा तर नेरमधील चार रुग्णांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. जिल्ह््यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. सध्या अ‍ॅक्टीव्ह बाधित रुग्णांचा आकडा १०२ असून आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या ३७१ एवढी झाली आहे.

आजपासून मार्केट सायंकाळी ७ पर्यंत
जिल्ह्यात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढला आहे. सध्या बाजारपेठ सकाळी ९ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ ला बंद केली जाते. परंतु गुरुवार ९ जुलैपासून बाजार बंद होण्याची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. सकाळी ९ ला सुरु होणारी बाजारपेठ सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. आठवड्यातील सर्व सातही दिवस ही नवी वेळ कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

१३ जणांनी केली कोरोनावर मात
कोरोनाची लागण झालेल्या १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या या १३ जणांना बुधवारी सुटी दिली गेली. आतापर्यंत २७० रुग्ण बरे झाले आहे.

Web Title: 25 new corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.