शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३८ ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवकांची कालबद्ध व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतची पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व इतर संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अनेक वर्षांपासून पदोन्नती मिळाली नाही. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्याकडेही युनियनने पाठपुरावा केला. अखेर शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता दहा वर्षे सेवा झालेल्या १८३ आणि २० वर्षे सेवा झालेल्या २८ व ३० वर्षे सेवा झालेल्या २७ ग्रामसेवकांना पदोन्नतीची भेट दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : जुन्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाता-जाता दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल २३८ ग्रामसेवकांना कालबद्ध आणि आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पदोन्नती देण्यात आली. जुने मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता ग्रामसेवकांना ही भेट दिली.गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवकांची कालबद्ध व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतची पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व इतर संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अनेक वर्षांपासून पदोन्नती मिळाली नाही. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्याकडेही युनियनने पाठपुरावा केला. अखेर शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता दहा वर्षे सेवा झालेल्या १८३ आणि २० वर्षे सेवा झालेल्या २८ व ३० वर्षे सेवा झालेल्या २७ ग्रामसेवकांना पदोन्नतीची भेट दिली.ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के, सरचिटणीस हिम्मतराव म्हातारमारे आदींनी या पदोन्नतीसाठी रेटा लावला होता. अखेर २३८ ग्रामसेवकांना पदोन्नती मिळाली आहे. मात्र काहींना पदोन्नतीच्या पदाशिवाय वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते.पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, विस्तार अधिकारी रामदास चंदनकर यांनी परिश्रमाने पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे विहित मुदतीत १०० टक्के काम झाले. तत्कालीन अधीक्षक सुनील वनकर व पंचायत विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनीही पदोन्नतीसाठी परिश्रम घेतले. आता त्रुटींमुळे ज्यांचे प्रस्ताव शिल्लक राहिले अशा प्रस्तावामधील त्रूटी काढून त्यांनाही पदोन्नती देण्यासंबंधी युनियन पाठपुरावा करणार आहे. तसेच २२ आणि २४ वर्षे कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्तावसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आणखी काही ग्रामसेवकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद