शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे

By admin | Updated: August 29, 2015 02:43 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत उमरखेड तालुक्यात ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे होत असल्याचे पुढे आले आहे.

अविनाश खंदारे उमरखेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत उमरखेड तालुक्यात ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे होत असल्याचे पुढे आले आहे. शाखा अभियंत्यांचेही संगनमत असून ग्रामसेवकांच्या निष्क्रीयतेमुळे कामे निकृष्ट होत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कामे असेल तर त्यासाठी ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर करणे बंधनकारक आहे. ई-निविदा न काढणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देश आहे. असे असतानाही उमरखेड तालुक्यातील दलित वस्ती, तांडा सुधार वस्ती, ठक्कर बाप्पा योजना, आमदार विकास निधी, खासदार निधी, बीआरजीएफ १३ वा वित्त आयोग, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीचे कामे अशा शासनाच्या विकासात्मक कामासाठी तीन लाख रुपयांच्यावर रकमेची कामे पार पडली. परंतु या कामाची कुठलीही ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही.उमरखेड तालुक्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या विकास कामाकरिता ग्रामपंचायतीला निधी दिला जातो. शासकीय नियमानुसार आलेल्या निधीचा ई-निविदा प्रणालीचा वापर करून ग्रामसेवकाने प्रक्रिया पार पाडली पाहिजे. परंतु संबंधित यंत्रणेच्या शाखा अभियंत्यांला हाताशी धरुन ई-निविदा न काढता तीन लाखांच्या वरची कामे ग्रामसेवकांनी केली आहे. ई-निविदा न करता १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ग्रामपंचायत विकास काम करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याचा करारनामा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामध्ये केला जातो. वास्तविक पाहता तालुक्यातील एकही ग्रामपंचयात आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. कारण कोणत्याही ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात दहा हजाराच्यावर रक्कम दिसून येत नाही. मग ही लाखो रुपयांची कामे ग्रामसेवक कशी पार पाडतात या बाबीची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गत वर्षी ई-निविदा न काढता काम पार पडलेल्या कामामध्ये नागापूर, ढाणकी, पोफाळी, तिवरंग, बेलखेड, वाणेगाव, लोहरा, खरुस, देवसरी, दिघडी, बोरी, ब्राम्हणगाव, गाजेगाव, बिटरगाव, जेवली, सोनदाबी, कुरळी, बोथा, डोंगरगाव, पिरंजी, बाळदी, मार्लेगाव, अंबाडी, नागेशवाडी, सुकळी, चिल्ली, दराटी, मुरली, मोहदरी, डोंगरगाव यासह मुळावा येथील कामांचा समावेश आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, वॉलकंपाऊंड, सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. ही कामे ई-निविदा न काढता ग्रामसेवक व शाखा अभियंत्याने परस्पर पार पाडली आहे. तसेच या कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते.