शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या खात्यांमध्ये १५०० कोटी अखर्चित निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 07:00 IST

कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व विभागांकडील अखर्चित निधी परत मागण्यात आला. राज्यात विविध विभागांच्या खात्यांमध्ये असा दीड हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु हा निधी नेमका कशा पद्धतीने परत करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी न केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देरोहयोचे १३५ कोटी वेगळे मार्गदर्शक तत्वांअभावी निधीचा परतावा अडचणीत ‘डीडीओं’ची कोंडी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व विभागांकडील अखर्चित निधी परत मागण्यात आला. राज्यात विविध विभागांच्या खात्यांमध्ये असा दीड हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु हा निधी नेमका कशा पद्धतीने परत करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी न केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे.राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी अखर्चित निधी ३० मेपर्यंत परत करण्याचे आदेश ४ मे रोजी जारी केले. निधी कोण्या हेडवर परत करावा हे स्पष्ट नाही. वित्त विभागानेही मार्गदर्शक तत्वे जारी केली नाही. त्यामुळे शासनाच्या २९ विभागांतर्गत राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहरण व सवितरण अधिकारी (डीडीओ) संभ्रमात सापडले. दुसरीकडे ३० मेपूर्वी अखर्चित निधी कोषागारात जमा करून खाते झिरो करा यासाठी विभाग प्रमुख तगादा लावत आहेत.

‘डीडीओं’नी मार्गदर्शन मागितलेकाही डीडीओंनी अखर्चित निधी परत करण्याची प्रक्रिया राबविली, चेक तयार केले तर काहींनी वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे.पाच ते दहा वर्षांपासूनचा निधीकाही खात्यांमध्ये पाच ते दहा वर्षांपासून हा निधी अखर्चित म्हणून नोंद आहे. केंद्र शासन, राज्य शासन, रोहयो, जिल्हा नियोजन समिती अशा वेगवेगळ्या हेडवरील हा निधी आहे. खात्यात आज हा निधी अखर्चित दिसत असला तरी लगतच्या भविष्यात तो कुणाची तरी देणे आहे. त्यामुळे आज हा निधी शासनाला परत केल्यास उद्या मागणाऱ्याला निधी द्यायचा कोठून असा प्रश्न आहे. एलआयसीचे धनादेश याच निधीतील एक प्रकार आहे. वर्षानुवर्षे अखर्चित म्हणून पडून असलेल्या या निधीवर शासनाला व्याज मिळते. व्याजाची ही रक्कम खात्यात कायम ठेवायची की शासनाकडे जमा करायची याबाबतही स्पष्ट आदेश नाहीत.

रोहयो मजुरांना पैसा द्यायचा कोठून ?रोजगार हमी योजनेचे १३५ कोटी पडून आहेत. रोजगाराच्या शोधात बाहेर जिल्ह्यात गेलेले मजूर कोरोनामुळे आपआपल्या जिल्ह्यात-गावात परतले आहेत. त्यांना रोजगार हमी योजनेवर कामे द्यायची आहेत. अखर्चित निधी शासनाला परत केल्यास त्यांना मजुरी द्यायची कोठून असा प्रश्न आहे. प्रत्येक डीडीओकडे शासनाचे चार ते पाच खाते आहेत. त्यात मार्च २०२० पर्यंत अखर्चित निधी पडून आहे.

कोषागाराचा निधी घेण्यास नकारमुख्य सचिवांच्या ४ मेच्या आदेशात निधी परताव्याबाबत सुक्ष्म व स्पष्ट मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे अनेक कोषागार कार्यालयांनी शासनाच्या विविध विभागातील अखर्चित निधी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वित्त विभागाच्या स्पष्ट सूचना आल्यानंतरच हा निधी स्वीकारला जाईल, असे डीडीओंना सांगितले जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १२ कोटीशासनाच्या विविध विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यालयांच्या बँक खात्यांमध्ये १२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. मात्र तो शासनाला नेमका कोणत्या पद्धतीने परत करावा याचे मार्गदर्शन न झाल्याने जिल्ह्यातील डीडीओ द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार