शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख हेक्टरात मोड

By admin | Updated: July 27, 2014 23:58 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रातले बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

दुबार पेरणीचे संकट : बँकांची पुन्हा कर्जास नकारघंटायवतमाळ : जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर क्षेत्रातले बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र बँका कर्ज द्यायला तयार नाही. यातून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अद्यापही पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.रोहिणी आणि मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाचे गणितच बिघडले. १७ जूनला पाऊस बरसताच शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. यानंतर महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र पाऊस बरसला नाही. यामधील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे कोरड्या जमिनीत होते. त्यामुळे पाऊस बरसताच हे बियाणे निघणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. दोन लाख हेक्टरपैकी एक लाख ३५ हजार हेक्टरवरचे बियाणे उगवलेच नाही. या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी तजवीज करावी लागत आहे. बँकांनी कर्जाचे वितरण केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला आहे. कृषी सेवा केंद्राचे विक्रेते उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही. सावकार शेतीचे विक्री खत करून मागतात. त्यामुळे शेतकरी मोठ्या कोंडीत सापडला आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार ३१ आॅगस्ट नंतरच या संपूर्ण बाबींवर विचार होणार आहे. त्यानंतर त्यावर धोरण ठरविले जाणार आहे. त्यामुळे हा मोठा कालावधी शेतकऱ्यांच्या हातून निघून जाणार आहे. संपूर्ण गणितच खरिपावर विसंबून असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्य शासनाने कुठलेही धोरण अथवा बियाण्यांची व्यवस्था केली नाही. बियाणे उगविले नसल्याची तक्रार कंपन्यांकडे नोंदविण्यात आली. त्याची पाहणी आणि त्यानंतर येणारा अहवाल यावरच शेतकऱ्यांना थोडीफार मदत मिळले. राष्ट्रीयीकृत बँकांची पाठ मागील काही दिवसांपूर्वी कृषी मंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वाटपात आघाडीवर असल्याचे सांगितले होते. यातून त्यांनी बँकांची पाठराखण केली. प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यात चित्र यापेक्षा वेगळे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी २७ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा बँक आणि ग्रामीण बँकेने ५० टक्के कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे त्यांना इतर सभासदांना कर्ज वाटप करताना कसरत करावी लागते. राष्ट्रीयीकृत बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी असतानाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या बँकांचे सभासद शेतकरी सावकाराच्या दारावर गेले आहे. (शहर वार्ताहर)