१३ वर्षानंतर पुसदला अध्यक्ष पदाचा बहुमान

By Admin | Updated: September 22, 2014 23:46 IST2014-09-22T23:46:46+5:302014-09-22T23:46:46+5:30

राज्याच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या पुसद तालुक्याला १३ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. आरती फुफाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.

13 years later, Pusala has been honored with the honor of being the President | १३ वर्षानंतर पुसदला अध्यक्ष पदाचा बहुमान

१३ वर्षानंतर पुसदला अध्यक्ष पदाचा बहुमान

आरती फुफाटे : राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी
पुसद : राज्याच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या पुसद तालुक्याला १३ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. आरती फुफाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांच्या रूपाने पुसदला सहाव्यांदा अध्यक्षपद मिळाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ साली झाली. तेव्हापासून ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा मिळाली. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान पुसद तालुक्यालाच मिळाला. १९६२ ते १९६७ पर्यंत देवराव पाटील चोंढीकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पाच वर्षांच्या कालखंडानंतर सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने पुसदकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा आली. १९७२ ते १९७७ असे पाच वर्ष ते अध्यक्ष होते. त्यांचा हा काळ अविस्मरणीय असाच होता. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि हिमाचलचे राज्यपालही झाले. त्यानंतर आठ वर्षाने गोविंदराव पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. ते पुसद तालुक्यातील बेलोरा गटाचे सदस्य होते. १९९२ साली पुन्हा एकदा पुसदच्या वाट्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद अ‍ॅड. नीलय नाईकांच्या रूपाने आले. २००० साली एक वर्षासाठी अनुसयाताई चौधरी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद विभूषित केले. जिल्हा परिषदेच्या ५२ वर्षांच्या कालखंडात पुसद तालुक्याला सहावेळा अध्यक्षपद प्राप्त झाले. डॉ. आरती फुफाटे या बेलोरा गटाचे प्रतिनिधित्व करतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 13 years later, Pusala has been honored with the honor of being the President