वणीत ९ तर आर्णीत १३ नामांकन दाखल

By Admin | Updated: September 27, 2014 23:23 IST2014-09-27T23:23:02+5:302014-09-27T23:23:02+5:30

वणी विधानसभा क्षेत्रासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदार संघात शेवटच्या दिवशी

13 nominations filed in 9 cases in Vanni | वणीत ९ तर आर्णीत १३ नामांकन दाखल

वणीत ९ तर आर्णीत १३ नामांकन दाखल

वणी : वणी विधानसभा क्षेत्रासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदार संघात शेवटच्या दिवशी तब्बल १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रासाठी शनिवारी भाजपातर्फे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार, राष्ट्रवादीतर्फे संजय नीळकंठ देरकर, बसपातर्फे राहुल पांडुरंग खापर्डे व अशोक बापूराव भगत, गोंगपातर्फे श्याम मारोती कोरवते, तर अपक्ष म्हणून राजेंद्र चिंतामण गोंडुलवार, शेख समीर शेख रफीक, महेंद्र देवराव पाटील आणि नारायण शाहू गोडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यापूर्वी वणी विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी लक्षवेधी मिरवणूक काढून राजू उंबरकर यांनी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारीच मिरवणुकीने शिवसेनेतर्फे विश्वास रामचंद्र नांदेकर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे वामनराव बापूराव कासावार यांनीही अर्ज भरला. यापूर्वी भारिप-बमसंतर्फे गीत घोष, अपक्ष म्हणून गणेश रामटेके, भाकपतर्फे अनिल घाटे, खोरीपतर्फे महादेव सिडाम, सिद्धार्थ सुखदेव नगराळे यांनी आंबेडकर पार्टी आॅफ इंडियातर्फे अर्ज दाखल केले होते. भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीततर्फे संजय देरकर यांनी नव्याने अर्ज दाखल करून त्यासोबत पक्षाचा शनिवारी एबी फॉर्म जोडला.
आर्णीत शनिवारी १३ अर्ज
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णी विधानसभा मतदार संघासाठी शनिवारी तब्बल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचा समावेश आहे. आर्णी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.
या मतदार संघातून शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड.शिवाजीराव शिवराम मोघे, शिवसेनेतर्फे डॉ.विष्णू शंकर उकंडे, तर प्रदीप गंगाराम मसराम यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणून प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. शनिवारी त्यात नऊ जणांची भर पडली. शनिवारी शिवसेनेतर्फे डॉ.संदीप प्रभाकर धुर्वे, भाजपातर्फे उद्धव चंपत येरमे व राजू नारायण तोडसाम, गोंगपातर्फे निरंजन शिवराम मसराम, राष्ट्रवादीतर्फे डॉ.विष्णू शंकर उकंडे, तर अपक्ष म्हणून अमोल सहदेव मंगाम, संभा दिलीप मडावी, हरिभाऊ कवडू पेंदोर, अनिल भावराव किनाके, रंजिता परशराम शिंदे, कृष्णा महादेव किनाके, अजय वसंत घोडाम व दत्तात्रय बापूराव सिडाम यांनी अर्ज दाखल केले. आता एकूण १0 उमेदवारांचे अर्ज या मतदार संघासाठी दाखल झाले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 13 nominations filed in 9 cases in Vanni