शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सात जागांसाठी १०३ उमेदवार

By admin | Updated: October 1, 2014 23:28 IST

सातही विधानसभा मतदारसंघातील चित्र ७४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. आमदाराच्या सात जागांसाठी आता

विधानसभा : ७४ उमेदवारांची माघार, चौरंगी लढती यवतमाळ : सातही विधानसभा मतदारसंघातील चित्र ७४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. आमदाराच्या सात जागांसाठी आता १०३ उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन मागे घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. सात मतदार संघातून तब्बल ७४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यात सर्वाधिक १८ यवतमाळातून, उमरखेड १७, पुसद १५, दिग्रस १०, राळेगाव ८, आर्णी ४ तर वणीतून दोन उमेदवारांनी मैदान सोडले. त्यात यवतमाळातून बाबासाहेब गाडे पाटील, राजाभाऊ ठाकरे, राजेंद्र पाटील या कुणबी उमेदवारांसह उमरखेडचे हरिश पाचकोरे, राळेगावातून सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश सोने, आर्णीतून उध्दव येरमे आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत पहायला मिळणार आहे. येथे प्रमुख चार पक्षांसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर रिंगणात आहेत. गत दोन निवडणुकांप्रमाणे यावेळीही ते प्रस्थापित उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे करू शकतात. त्यातच मनसे नेते राज ठाकरे यांची जाहीर सभा झाल्याने उंबरकरांना आणखी बळ मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वामनराव कासावार हे सहाव्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे संजय देरकर, शिवसेनेचे विश्वास नांदेकर, भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुलवार यांचे आव्हान आहे. देरकर, नांदेकरांमुळे कुणबी मतांचे विभाजन होणार आहे. बोदकुलवार पाटण परिसरातील असल्याने त्यांचा कासावारांच्या मतांमध्ये मोठा वाटा राहणार आहे. कुणबी मतांच्या विभाजनावर कासावारांचे गणित नेहमीच अवलंबून राहिले आहे. मात्र यावेळी स्वबळावरील निवडणुकीमुळे कासावारांना आपल्या बालेकिल्ल्यातील भाजपा उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वसंत पुरके यांच्या विरोधात भाजपाचे अशोक उईके, शिवसेनेचे उमेदवार तथा पोलीस जमादार उत्तम मडावी, राष्ट्रवादीचे मिलिंद धुर्वे यांचे आव्हान आहे. या तिघांपैकी पुरकेंना कोण फाईट देतो याकडे लक्ष लागले आहे. दादा गट काँग्रेसमध्ये आल्याने पुरके प्लस दिसत असले तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे त्यांच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. यावेळी या मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते प्रवीण देशमुख यांची खरी ताकद पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ही ताकद आघाडीमुळे काँग्रेसच्या मागे दडपली जात होती. मात्र यावेळी देशमुखांना स्वत:सह पक्षाचे वजन दाखविण्याची जणू सुवर्णसंधी चालून आली आहे. पुरकेंच्या विरोधात सर्वसंमतीने एकच उमेदवार देण्याची व्यूहरचना निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. मात्र ज्यांनी या व्यूहरचनेसाठी पुढाकार घेतला तेच पुरकेंच्या बाजूला जाऊन बसल्याने ही योजनाच चौपट झाली. हीच स्थिती शिवसेना व भाजपाची आहे. (जिल्हा प्रतिनिधी)