शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०३ उमेदवारांत फक्त पाच महिला रिंगणात

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर

पुसद : महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०३ उमेदवारांपैकी ४२ उमेदवार अपक्ष व फक्त पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण १०३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात पुरुषांची संख्या ९८ तर महिलांची संख्या केवळ पाच आहे. त्यात पुसद, उमरखेड मतदारसंघातून प्रत्येकी दोन व दिग्रस मतदारसंघातून एक महिला निवडणूक लढवित आहे. यवतमाळ, वणी, आर्णी व राळेगाव मतदारसंघात एकही महिला निवडणूक रिंगणात नाही. राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी यवतमाळ जिल्ह्यात दिली नाही. पुसद मतदारसंघातून प्रिती मारोतराव कांबळे व इंदूबाई शाालिकराम तांबारे या दोघी अपक्ष उमेदवार आहेत. उमरखेड मतदारसंघातून शोभा रावसाहेब देशमुख व अन्नपूर्णा मुकिंदा बन्सोड या दोघी अपक्ष उमेदवारच आहे. तर दिग्रस मतदारसंघातून उषा माधवराव लोळगे या वेलफेअर पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या नशीब अजमावित आहेत.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार यवतमाळ मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार आहेत. यामध्ये एकही महिला उमेदवार नाही. सर्वच पक्षांच्या महिला आघाड्या स्थापित आहेत. महिला पदाधिकारी पाच वर्षे पक्षासाठी सर्वतोपरी पक्षाच्या प्रचार कार्यात सहकार्य करीत असते. महिलांच्या अस्मितेविषयी सर्वच राजकीय नेते वेळोवेळी भाषणे देतात. प्रत्यक्षात मात्र या नेत्यांचा कांगावा हा निव्वळ वांझोटा ठरतो. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उघडपणे पक्षाच्या कार्यप्रणालीविरुद्ध आवाज का उठवित नाही हा प्रश्न आहे. राजकीय पक्ष निव्वळ स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारीत आहे. निवडणुकीत महिलांना डावलून त्यांच्या कार्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवित आहे. अशा परिस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आपली नाराजी दाखविली पाहिजे, असा सूर समाजातून उमटत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या महिला आघाडीतील महिला पदाधिकारी चुप्पी का साधतात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.