Next

मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:18 PM2019-10-15T18:18:18+5:302019-10-15T18:18:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी महाविद्यालय परिसरातील झाडं तोडल्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त होत असताना पुण्याच्या महापौरांनी अजब दावा केला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी महाविद्यालय परिसरातील झाडं तोडल्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त होत असताना पुण्याच्या महापौरांनी अजब दावा केला आहे. मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, तर फक्त फांद्या तोडल्या, असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे. टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर 17 ऑक्टोबरला मोदींची सभा होणार आहे.