मोबाईलसाठी प्लॅस्टिक स्क्रीनगार्ड लावायचं की टेम्पर्ड ग्लास? Plastic Screenguard | Tempered glass
 By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 07:14 IST2021-02-10T07:13:44+5:302021-02-10T07:14:06+5:30
नवीन मोबाईल विकत घेतला की स्क्रीनचं संरक्षण म्हणून स्क्रीनगार्ड आणि कव्हर या दोन गोष्टी आपण विकत घेतो. मोबाईलला मेटल बॉडी जरी असली, तरी त्यावर बॅक कव्हरचं आवरण आणि डिस्प्लेवर उत्तम गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन असलं तरी त्यावर स्क्रीनगार्डचं कवच घातलंच पाहिजे. याचं कारण काय तर चुकून मोबाईल हातातून पडला तरीही जास्त नुकसान होऊ नये. त्यामुळे वर्षभरानंतर मोबाईलची किंमत जरी अर्धी झालेली असली तरी डिस्प्लेची किंमत मात्र तेवढीच राहते.