Next

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पेट्रोलचा खर्च २५ % कमी होतो? Benefits of Using Electric Vehicle

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 00:22 IST2021-04-06T00:21:58+5:302021-04-06T00:22:32+5:30

पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको. भारतात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन लाँच करीत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांना चांगले मार्केट मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल कि बॅटरी वर चालणारी गाडी म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन आणि पेट्रोल वर चालणारी गाडी... या दोन्ही वापरताना मेहनत तर आहेसच... पेट्रोल गाडी वापरत असताना आपल्याला पेट्रोलची बचत, पेट्रोलचे दर इत्यादी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात... आणि इलेक्ट्रिक गाडी वापरताना आपल्यला बॅटरी ची काळजी घ्यावी लागते... पण तुम्हाला इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे फायदे माहित आहेत का? चला तर मग आजच्या video मध्ये जाणून घेऊयात इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे फायदे..